Type to search

जळगाव

खासगी बसमालकांचा उद्यापासून संपाचा इशारा

Share

जळगाव । जळगाव- औरंगाबाद रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या वर्षभरापासून संथगतीने सुरु आहे. खराब रस्त्यामुळे बसच्या देखभाल दुरुस्तीच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. तसेच रात्री या रस्त्यावर बसेस संथ गतीने जात असल्याने बसवर दरोडा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या घटनेच्या निषेधार्थ जळगाव-पुणे खासगी बसमालकांनी मंगळवार दि. 24 ते 26 रोजी संप पुकारण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.

यावेळी प्रमोद झांबरे, विनोद पाटील, वसंत नेटके, सतीश पाटील, सौरभ पाटील, जयदीप पाटील, विपीन पाटील, अनुप लाठी, राजदीप पाटील, नितीन अत्तरदे, हितेश गडे, पंकज जोगी, दिनेश चौधरी, राजेश मुंदडा आदींनी जळगाव- औरंगाबाद तसेच जळगाव-धुळे या रस्त्याची अत्यंत दूरावस्था झाल्यामुळे प्रवासी आणि बस मालक यांना विविध प्रकारच्या जीवघेण्या संकटांना सामोरे जावे लागत आहे.भविष्यात संकटाचा सामना कशा प्रकारे केला जावा,

याविषयी मंथन करण्यासाठी दि. 24 ते 26 रोजी जळगाव ते पुणे व मुंबई तसेच दि. 25 ते 27 रोजी पुणे व मुंबई ते जळगाव जाणार्‍या व येणार्‍या सर्व बसेस बंद ठेवण्यात येणार आहे. जळगाव- औरंगाबाद मार्गाच्या दुरावस्थेच्या त्रासाला कंटाळून सर्व लख्झरी बस मालक, चालक,संचालक एकत्रित येऊन विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात येणार आहे. जळगाव- औरंगाबाद रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्याचे आदेश शासनाने द्यावे व काळ ममर्यदा निश्चित ठरवून द्यावी.त्यावर संबंधित ठेकेदाराने अवलंब करावा, यासह विविध मागण्यांचा समावेश आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!