Type to search

जळगाव

मनपा रस्त्यांवरील खड्डे दुरूस्ती करणार केव्हा?

Share

जळगाव । शहरातील रस्त्यांची चाळण झालेली असतांना मनपा प्रशासन, सत्ताधारी मात्र दुर्लक्ष करीत असल्याचा सूर सामान्य जनतेतून निघत आहे. खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे अशीच परिस्थिती पुन्हा शहराची झालेली आहे. यामुळे मात्र नागरिकांसह वाहनधारकही त्रस्त झाले आहेत. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. मात्र शहर विकासाअंतर्गत तसेच मूलभूत गरजा अंतर्गतचा हा विषय असल्याने यास आचारसंहितेची आडकाठी येत नसल्याचे मनपा गोटातून समजते.

खड्डे झाले अधिक, रस्ते झालेत कमी.अशीच परिस्थिती रस्त्यांची झाली असल्याने वाहनधारकांनाही आपली वाहने चालविता ेणे शक्य होत नाही. वाहनधारक तसेच नागरिकांचे मात्र हाल होत आहेत. रोज कुणी ना कुणी पडत असते. आमदार राजु मामा भोळे हेही यातून सुटले नाहीत, एके दिवशी तेही खड्ड्यामुळेच पडले होते. त्यांनाही दवाखान्यात दाखल व्हावे लागले, त्यामुळे रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. मात्र याकडे लक्ष द्यायला ना मनपाला वेळ नाही, ना मनपाच्या अधिकार्‍यांना वेळ नाही, ना सत्ताधार्‍यांना वेळ नाही, अशीच स्थिती सध्या दिसून येत आहे.

निधी असूनही कामे नाहीत
नगरोत्थान अंतर्गत रस्त्यांच्या कामांना निधी उपलब्ध झाला असला तरी मात्र कामे प्रत्यक्षात होत नाहीत, रस्त्यांवर पडझडीच्या घटना या दिवसेंदिवस वाढतच आहेत. रस्त्यांची कामे करायला वेळ कुणाकडे आहे असेच सध्या मनपा गोटात चित्र दिसून येत आहे. मनपात निवडणुकांकडे सार्‍यांचेच लक्ष लागले असून यामुळे मात्र विकासकामांना खोळंबा झाला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!