Type to search

जळगाव

खेडी खून प्रकरणातील आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी

Share

जळगाव । शहरानजीकच्या खेडी या उपनगरातील पेट्रोलपंम्पाजवळ शनिवारी सकाळी झालेल्या बांधकाम व्यावसायीकाच्या खून प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या आरोपीला रविवारी एमआयडीसी पोलीसांनी न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

शहरातील खेडी बुद्रुक परिसरातील पेट्रोल पंपाजवळ शनिवारी सकाळी 9:30 ते 10.30 वाजेच्या सुमारास बिपीन दिनकर मोरे (वय 40 ) हे आपल्या दुचाकीवरून पेट्रोल भरण्यासाठी जात असताना चार दोघांनी अचानक चाकूने हल्ला केला. या घटनेत बिपीन याचा जागीच मृत्यू झाला होता. दरम्यान, घटनेच्या नऊ तासानंतर एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने संशयित आरोपी अमोल उर्फ कार्तिक नाना सोनवणे याचेसह एकास तळोदा , नंदूरबार येथून अटक केली होती. या गुन्हयातील दूसरा संशयीत अल्पवयीन असल्याने पोलीसांनी रविवारी अमोल यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान दूसर्‍या अल्पवयीन संशयीताची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!