Type to search

जळगाव

जळगाव पीपल्स बँकेने महिला बचत गटांना दिले बळ

Share

जळगाव । पीपल्स बँकेचे संलग्नित 1400 चे वर बचत गट आहेत. तसेच पहिले लिंकेज व रिपीटेड अशा रितीने बचत गटांना एक कोटी पाच लाखांचे कर्ज उपलब्ध करुन दिले आहे. नाबार्डच्या सहकार्याने बँकेच्या बचत गटांना व्यवसायाभिमुख व उपयुक्त विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले आहे. बचतगटाच्या माध्यमातून बँकेशी 10,000 चे वर महिला संलग्न झालेल्या आहेत. अशाप्रकारे बँक फायनान्शियल इन्क्लुजनसाठी महत्वपूर्ण कार्य करीत आहे. बँकेने नाबार्डच्या सहकार्याने, महिला बचत गटांचा दिवाळी महोत्सव 2019 यशोदया हॉल, महेश प्रगती हॉलसमोर जळगाव येथे सुरु झाला आहे.

या कार्यक्रमाचा शुभारंभ दि.18 रोजी दीपप्रज्वलनाने निधी एन्टरप्राईजेसच्या वैशाली विसपुते, दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय कामगार शिक्षण व विकास बोर्डच्या शिक्षणाधिकारी सारिका डफरे, नाबार्ड जिल्हा विकास प्रबंधक श्रीकांत झांबरे, डॉ.जयंत शेळगीकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील, संचालक सुनिल पाटील, संचालिका सुरेखा चौधरी, स्मिता पाटील, एमडी दिलीप देशमुख व बँकेचे अधिकारी उपस्थित होते.

मी स्वत: खुप हलाखीच्या परिस्थितून हे ध्येय गाठलेले आहे. जेव्हा स्वत:चा उद्योग सुरू करायचा होता तेव्हा बँकेने मला खूप गोष्टी शिकविल्या,असे मत उद्योजक वैशाली विसपुते यांनी व्यक्त केले. पुरूष आणि स्त्री हे समाजरूपी पक्षाचे दोन पंख आहे. दोघेही पंखांमध्ये एक सारखे बळ, आकार आणि शक्ती हे जर समान असले तरच पक्षी उंच भरारी घेऊ शकतात. स्त्री पुरूष समानता ही आपल्या मुलींपासुनच सुरू केली पाहिजे,असे विचार शिक्षणाधिकारी सारिका डफरे यांनी मांडले.

बचतगटांच्या वतीने मनिषा विधाते यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सहयोगिनी दीपाली जोशी, अंजली बोरसे यांनी केले. या दिवाळी उत्सवात महिला बचत गटांनी बनविलेले दागिने, साडी, ड्रेस मटेरीयल, सौंदर्य प्रसाधने, गिफ्ट आर्टीकल्स, हँडीक्राफ्टस्, खाकरा, चकली, बॅग्स् पर्सेस्, बेडशिटस्, पिलो कव्हर्स, डोअरमॅटस् तसेच दिवाळी फराळ, सजावट साहित्य आणि सर्व प्रकारचे पापड व मसाले अशा विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. कश्मिरी स्वेटर्स शॉल तसेच फुड कोर्ट व चविष्ट खान्देशी पदार्थ हे विशेष स्टॉल्स आहेत. जळगावकर ग्राहकांना दिवाळीकरीता आवश्यक खरेदीकरीता अत्यंत दर्जेदार उत्पादने येथे उपलब्ध आहेत. हा उत्सव दि.18 ते दि.20 ऑक्टोबरपर्यंत सुरु आहे.याचा लाभ घेण्याचे आवाहन बँकेने केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!