Type to search

जळगाव

फुले मार्केटमधील 8 अनधिकृत गाळे लवकरच होणार ‘सील’

Share

जळगाव । शहरातील महात्मा ज्योतिराव फुले व सेंट्रल फुले मार्केटमधील काही व्यापार्‍यांनी मिटर रुम, जिन्या खालील जागेत पक्के बांधकाम करुन अनधिकृतपणे गाळे तयार केले असून त्यांचा व्यवसायीक वापर केला जात असल्याचे आढळून आल्याने अशा 8 अनधिकृत गाळ्यांवर लवकरच कारवाई करण्यात येणार आहे.

महापालिकेचे उपायुक्त डॉ. उत्कर्ष गुटे यांनी याबाबत नुकतीच महात्मा ज्योतिराव फुले व सेंट्रल फुले मार्केटमध्ये पाहणी केली असता अनेक जणांकडून मीटर रुम व जिन्याच्या जागेचा वापर दुकानांसाठी केला जात असल्याचे आढळून आलेे. त्यानुसार जिन्याखाली उभारण्यात आलेले गाळे व मीटर रुमचा दुकानासाठी वापर करणार्‍या 8 गाळेधारकांवर कारवाई केली जाणार आहे. महात्मा फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केटमधील व्यापार्‍यांकडून मनपाच्या मालकीच्या गाळ्यांच्या रचनेत परस्पर बदल करण्यात आले आहे.

तसेच दुकानाच्या भिंतींना बाहेरुन कपाट तयार करुन इतर व्यापार्‍यांना व्यवसायासाठी भाड्याने देण्यात आले आहे. तसेच दुकानात दोन भाग पाडूनही काही व्यापार्‍यांकडून भाडे कमविण्यात येत आहे. व्यापारी यावरच न थांबता ज्या ठिकाणी मनपाने गाळे बांधलेलेच नाहीत अशा ठिकाणी गाळे उभे करुन व्यापार करण्यात येत असल्याचे आढळून आले आहे. या 8 गाळ्यांची फाईल उपायुक्त गुटे यांनी आयुक्तांकडे सादर केली आहे. गाळे सील करण्याची कारवाई लवकरच होणार आहे. आयुक्तांनी आदेश काढल्याचे सूत्रांकडून समजते.

गाळे परस्पर भाड्यानेे
या व्यापारी संकुलामधील गाळे भाडे कराराने देण्यात आले होते. या संकुलांपैकी 20 मार्केटमधील गाळ्यांचे भाडे करार संपुष्ठात आलेले आहे. यात अनेक गाळेधारक व्यापार्‍यांनी आपली दुकाने परस्पर दुसर्‍यांना भाडे कराराने दिलेली असून मनपाला अंधारात ठेवलेले आहे. तसेच असाच प्रकार इतर व्यापारी संकुलांमध्येही झाला आहे काय याची चाचपणी मनपा अधिकार्‍यांतर्फे सुरू असून एकूणच गाळेधारकांच्या प्रश्नावर मनपा प्रशासन ठोस पावले उचलण्याच्या मार्गावर असल्याचेही मोठ्या अधिकार्‍यांकडून समजते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!