Type to search

जळगाव

एटीएमवर ठणठणाटच!

Share

जळगाव । सध्या सणासुदीचे दिवस असल्याने पैसा सर्वांनाच लागत आहे. कधी नव्हे एवढ्या सुट्या या महिन्यात बँकांना आहेत. तब्बल 11 दिवस बँका या ऑक्टोबर महिन्यात बंद राहणार आहेत. दोनवेळा लागोपाठ तीनतीन, चार चार दिवस सुट्या येत असल्याने सामान्य नागरिकांची पैशाविना अडचणी वाढत असल्याचे दिसून येत आहे. सण म्हटला म्हणजे पैसा हा लागतोच. असे तीनतीन दिवस जर बँका सणासुदीच्या दिवसात बंद राहतील मग सामान्य नागरिकांनी करायचे कसे?

एटीएमची संख्याही तोकडीच
डिजीटल व्यवहारांचा जमाना आहे त्या मानाने एटीएम संख्या ही नगण्यच आहेत. वाढती लोकसंख्या, बँकांचे जाळे, वाढते उद्योग व्यवसाय पाहता एटीएमची संख्या ही नगण्यच असल्याचे आढळून येत आहे. नेहरु पुतळ्याजवळ एक दोन एटीएम, 17 मजली समोरील एटीएम, युनियन बँक, सेंट्रल बँक, महाराष्ट्र बँक, आयडीबीआयचे एटीएम, स्टेट बँकेतील एटीएम, स्टेट बँकेचे स्वातंत्र्य चौकातील एटीएम, जळगाव जनता बँक, पीपल्स बँकचे एटीएम आयडीबीआयचे येथीलच एक एटीएम यासह शहरात इतर किरकोळ ठिकाणी एटीएम आहेत. मात्र तेही अपुरे पडत असल्याचे चित्र आहे. एटीएम वाढवायला पाहिजे, या सर्व एटीएमवर सुरक्षा व्यवस्थाही चोख स्वरुपातली पाहिजे.

बँका बंद असल्याने होताहेत हाल
आजकाल डिजीटल युगचा जमाना असला तरी ग्रामीण भागात आजही मोठ्या प्रमाणावर माहेरवाशीणी या आपल्या माहेरी परततात. दिवाळीच्या दिवसात मामाच्या गावाला जाण्याचा मोह आणि आनंद चिमुकल्यांच्या दृष्टीने वेगळाच असतो. मुलांना दिवाळीनिमित्त मामांकडून कपडे लत्ते भेटतात. गिफ्ट भेटतात त्यामुळे बालमंडळी ही मामांकडे यायला अति उत्सुक अस

तात. तेव्हा त्यांनाही पैसा हा आवश्यक असतो. तसेच माहेरी आलेल्या मुलीला, तिच्या मुलांना घेण्यादेण्याकरीता पैसा हा लागतोच त्यासाठी बँकेत धाव घ्यावी लागते. बँका बंद असल्याने हाल होतात. म्हणूनच एकतर बँकांच्या लागोपाठ येणार्‍या सुट्या या मध्यंतरीत खंडित कराव्यात अथवा एटीएमवर पैशांचा तुटवडा भासू देवू नये.

डिजिटल युगाचा जमाना
आजकाल डिजीटल युगचा जमाना आहे. डिजीटल जमान्यामुळे बहुतेक व्यवहार हे ऑनलाईन होत आहेत व अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी पुढे येत आहे. आता मोबाईल टू मोबाईल खाते व्यवहार सुरू झाला आहे. बरेच व्यवहार हे आता ऑनलाईन, पेटीएम, रुपे कार्ड, स्वाईप मशीन, डेबीट कार्ड ने व्यवहार झपाट्याने वाढत आहेत. रोखीने व्यवहार कमी करण्याचे प्रयत्न शासनातर्फे करण्यात येत आहेत. डीजीटल व्यवहारांकडे वळा असा संदेशच आता सवार्र्ना दिला जात आहे. त्या दृष्टीने आता व्यवहारही डिजीटल होवू लागले आहेत मात्र तोपयर्र्त एटीएमवरुन पैसे काढणे हे अगदी सहज सोपे आहे म्हणून बहुतेक नागरिकांचा ओढा हा एटीकडेकडेच अधिक असतो. तेव्हा जर अशा लागोपाठ सुट्या बँकांना येत असतील तर त्या कालावधीत एटीएमवर पैसा उपलब्ध करुन देणे हे प्रत्येक बँकांचे काम आहे. तशी व्यवस्थाच बँकांनी करुन ठेवायला पाहिजे. बहुतांश नागरिक हे एटीएम वापरतात.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!