Type to search

जळगाव

लोखंडाचे दर ६ हजारांवरुन आले ३५०० शे वर !

Share

जळगाव | आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्वस्त स्क्रॅप अर्थात भंगार भारतात मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याने, गेल्या सात आठ दिवसांत लोखंडांचे दर तब्बल २० टक्क्यांनी घसरले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत झालेल्या उलाढालीचा फटका जिल्ह्यापरिसरातील लोखंड विक्रेत्यांना बसला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सहा हजार रुपये क्विंटल दराचे लोखंड सद्य:स्थितीत ३,३०० ते ३,६०० रुपयांवर येऊन थांबले आहेत. त्यामुळे लोखंड, बांधकामाचे स्टील साहित्य नफा तर दूरच परंतु विकत घेतलेल्या निम्मे दरात व्यापार्‍यांना विक्री करावी लागत आहे.

इमारत बांधकामाच्या व्यावसायिकांवरच बाजारपेठेतील आर्थिक दळणवळण इमारत बांधकामासाठी लोखंडी सळईची मागणी नेहमीच वाढत्या बांधकामांमुळे कायम असते. लोखंडाचे भाव मुळात बाजारपेठेतील स्क्रॅपवर व मागणीवर अवलंबून असते. गत काही महिन्यांपासून बांधकाम व्यावसायात आलेल्या मंदीमुळे लोखंडाला मागणी नाही. संपूर्ण स्टील इंडस्ट्रीत लोखंड, स्टिलचे भाव घसरल्याने ज्या व्यापार्‍यांनी महागड्या दरात लोखंड खरेदी केले होते, ते त्यांना आता तोट्याच्या दरात साठा विकण्याची वेळ आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून देशभरातील बाजारपेठात २,५०० रुपये क्विंटल असलेला स्क्रप आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत केवळ १,५०० रुपये प्रति क्विंटलच्या दरात उपलब्ध होत आहे. बाजारपेठेत स्टील, लोखंडाचे भाव कमी झाल्याने घर बांधकामासाठी परवडणार असल्याचे बांधकाम व्यावसायिकांचे मत आहे. एकीकडे लोखंड स्वस्त झाले असले तरी वीटा आणि वाळूचे दर मात्र वधारलेले आहे. त्यामुळे लोखंडात जरी बचत होत असली तरी दुसर्‍या मार्गाने ही रक्कम जात आहे. त्यामुळे घरे, इमारती बांधकाम क्षेत्रात या मंदीचा दर कमी होण्याने फारसा फरक पडणार नसल्याचे व्यावसायिकांनी सांगीतले.

लोखंड स्टीलचे दर कमी झाल्याने शहर परीसरात बर्‍याच ठिकाणी बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी खिडक्यांच्या जाळया, लोखंडी ग्रील, दरवाजे आदी वेल्डींगची कामे मोठया प्रमाणावर मागणी आहे. स्टीलचे दर निम्म्यावर आले असल्याने ग्राहकांना याचा याचा मोठया प्रमाणावर फायदा होईल.
-प्रकाश पाटील, सद्गुरु वेल्डिंग

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!