Type to search

जळगाव

ग.स.सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा आज गाजणार

Share

जळगाव । ग.स.सोसाटीची वार्षिक सर्वसाधरण सभा रविवार दि. 25 रोजी दुपारी 12.30 वाजता नूतन मराठा महाविद्यालयाच्या आवारात होणार आहे. या सभेत 1 ते 13 विषय पटलावर असून संस्थेचे सभासद योगेश सनेर, रावसाहेब पाटील यांचे सभासदत्व रद्द करण्याचा विषय ठेवण्यात आला आहे. दरम्यान, सहकार गटातून लोकसहकार गटाचे निर्मिती करुन उभी फूट पाडण्यात आली आहे. त्यामुळे दोन गट तयार झाले असून ग.स.सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधरण सभेत सहकार गटाचेे संचालक तटस्थ राहण्याचा पवित्रा घेतल्याचे वृत्त आहे. त्यामुळे सर्वसाधरण सभा गाजण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सहकार गटाची भूमिका तटस्थ
प्रगती गटाचे रावसाहेब मांगो पाटील व योगेश जगन्नाथ सनेर यांच्या अपात्रतच्या विषयावर आमच्या सहकार गटाची भूमिका तटस्थ आहे. जनरल मिटिंगमध्ये आम्ही भाग घेऊ किंवा नाही ते उद्या ठरवू, असे मत सहकार गटनेते उदय पाटील यांनी सांगितले.

सहकार गटाचे काही संचालक संपर्कात
मुदत संपलेल्या 19,113 सभासदांचा 14 ऑगस्टपासून नवीन जनता अपघात विमा रुपये एक लाखावरुन तीन लाख केला. यापुढे विम्याची मुदत संपणार आहे. सभासदांनादेखील लाभ मिळेल. दरम्यान, सहकार गटाचे काही संचालक संपर्कात असून लवकरच लोक सहकार गटामध्ये प्रवेश करतील, असे नेरकर म्हणाले.

अहवाल छपाईत 11 लाखांची बचत
ग.स.सोसयटीच्या 109 वर्षांच्या इतिहासात प्रथमच सन 2018-19 या वर्षाचा वार्षिक अहवाल साप्ताहितामध्ये प्रसिध्द करुन छपाईवर होणार्‍या खर्चात 11 लाख रुपयांची बचत केली आहे. अशी माहिती लोकसहकार गटाचे अध्यक्ष विलास नेरकर यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी गटनेते तुकाराम बोरोले, ग.स.अध्यक्ष मनोज पाटील, उपाध्यक्ष भानुदास भदाणे, विश्वास सूर्यवंशी, अनिल गायकवाड पाटील, सुभाष जाधव, सुनील पाटील, नथ्थू पाटील, सुनील अमृत पाटील, यशवंत सपकाळे, ज्ञानेश्वर सोनवणे, संजय पाटील, दिलीप चांगरे, संजय ठाकरे, सुभाष पाटील आदी उपस्थित होते.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!