Type to search

जळगाव

गोविंदा आला रे.. आला..

Share

जळगाव । गोविंदा रे गोपाळा…यशोदेच्या नंदलाला…, गोविंदा आला रे.. आला.. अशा विविध गीतांवर ताल धरीत नवीपेठ गणेश मंडळ चौकात गोविंदाने मोठ्या उत्साहात शनिवारी दहीहंडी फोडली. संध्याकाळी 5 वाजता सुरु झालेल्या दहीहंडीचा थरार हा रात्री उशिरापर्यंत सुरु होता. नवी पेठ युथ फोरम, नवी पेठ गणेश मंडळ, युवा गर्जना फौंडेशनतर्फे हा दहीहंडी महोत्सव आयोजित होता. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हंडी पूजन करून मनोगत व्यक्त केले.

यावेळी नवी पेठ गणेश मंडळाचे अध्यक्ष प्रमोद अग्रवाल, गिरीश झंवर, अमोल जोशी, विनोद मुंदडा, सुनील जोशी, अतुल वाणी, कैलास मुंदडा,अभिषेक झंवर, कृष्णा सोनवणे, युवा गर्जना अध्यक्ष मधुर झंवर यांचेसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. मच गया शोर सारी नगरी रे….सारी नगरी रे…..आया बिरज का बांका, संभाल तेरी गगरी रे…..असे म्हणत काव्यरत्नावली चौकात तरुणींची दहीहंडीने उपस्थितांची मने जिंकली. यावेळी आठ वर्षीय शुभदा खेडकरने 5 थर रचून दहीहंडी फोडली.

रोप मल्लखांबाचे प्रात्यक्षिक
बेंडाळे महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी डॉ.अनिता कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली रोप मल्लखांबाचे प्रात्यक्षिक सादर केले. या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण वेशभूषा करून वातावरण भक्तीमय बनविले. याशिवाय सेल्फी स्पर्धा, 5 संघांचे सांस्कृतिक नृत्य सादर झाले. विजेत्या संघाला माजी महापौर विष्णू भंगाळे, पो.नि.अनिल बडगुजर, युवाशक्तीचे संस्थापक विराज कावडिया, सचिव अमित जगताप, अध्यक्ष मनजीत जंगीड, संदीप सूर्यवंशी यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन गौरविले. प्रशांत वाणी, शिवम महाजन, विनोद सैनी आदींनी परिश्रम घेतले.

100 वाद्यांचे पथक आकर्षण
मुंबई येथील प्रशिक्षकानी महिला गोविंदाना प्रशिक्षण दिले होते. अमळनेर येथील सिद्धार्थ व्यायाम शाळेच्या 100 वादकांच्या ढोल पथकाने महिला गोविंदाचे मनोबल वाढविले. ढोल ताशांच्या गजरात शहरातील महिला व तरुणींनी जल्लोष करीत महिला गोविंदाना प्रोत्साहन दिले. युवा गर्जना ढोल पथकानेही कार्यक्रमात रंगत आणली होती. सुमारे दोन तास ढोल पथकाने ढोल वाजवीत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते. प्रसंगी जळगाव जनता बँकेचे संचालक संजय बिर्ला, सपन झुणझुणवाला, यांनी प्रमुख उपस्थिती दिली. मंडळातर्फे क्रेनद्वारे दहीहंडी 15 फुट उंच लावण्यात आली होती. ढोल ताशांच्या गजरात सुमधुर गीतांनी दहीहंडी रंगली. प्रत्येक मिनिटाला चाललेला थरार हा नागरिकांची उत्सुकता शिगेला नेत होता.

महिला गोविंदाचाही थरार…
युवाशक्ती फाउंडेशन, विद्या इंग्लिश मिडीयम विद्यालय, ज्ञानयोग वर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आणि नमो आनंद नोटबुक प्रायोजित काव्यरत्नावली चौकात तरुणींची दहीहंडी शनिवारी सायंकाळी 5 वाजता सुरु करण्यात आली. पुरुषांसह महिलांचा दहीहंडी उत्सवात सहभाग वाढावा हा यामागील प्रमुख उद्देश होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुरेश भोळे, महापौर सीमा भोळे, उद्योजक भरत अमळकर, आनंद कोठारी, वुमनिया ग्रुपच्या पूजा मुंदडा, अनुभूती विद्यालयाच्या संचालिका निशा जैन, रायसोनी इन्स्तीट्युटच्या संचालिका डॉ. प्रीती अग्रवाल, संगीता पाटील, आयएमआर संस्थेच्या संचालिका डॉ. शिल्पा बेंडाळे, अखील भारतीय मारवाडी महिला मंडळाच्या राजकुमारी बाल्दी, अध्यक्ष विराज कावडिया, सचिव अमित जगताप उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!