Type to search

जळगाव

बहिणाबाईंच्या अपूर्ण स्मारकाचा प्रश्न सहा महिन्यांत मार्गी लावणार – खासदार उन्मेश पाटील

Share

चोपडा । पालकमंत्री व मुख्यमंत्री यांचेसोबत बैठक घेवून येत्या सहा महिन्यात कवियत्री बहिणाबाई चौधरी यांच्या आसोदा येथील माहेरात असलेल्या स्मारकाचा रख़डलेला प्रश्र्न सोडविणार असल्याचे खासदार उन्मेश पाटील यांनी सांगीतले. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी आसोदा येथे बहिणाईच्या चौधरीवाड्यात आयोजित अभिवादन कार्यक्रमाप्रसंगीत ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, मंत्रालय पातळीवर निधीसह आराखड्यानुसार स्मारक उभारणीकामी पाठपुरावा स्वतत्र बैठक लावून चर्चा केली जाईल. यावेळी पं. स.सदस्य ज्योती महाजन, सरपंच नबाबाई बिर्‍हाडेे, उपसरपंच अरूण कोळी, सामाजिक कार्यकर्ते रवी देशमुख, मिलींद चौधरी, ग्रा.पं.सदस्य अनिल महाजन, हेमंत पाटील, संजय बिर्‍हाडेे, रविकांत चौधरी, चिंधु महाजन, दशरथ महाजन, खेमचंद महाजन, स्मारक समिती अध्यक्ष किशोर चौधरी, उपाध्यक्ष प्रदीप भोळे, संजीव पाटील, अर्जुन परदेशी, सोनु कापसे, अशोक भोळे,महेश भोळे उपस्थित होते. सूत्रसंचालन किशोर चौधरी यांनी तर आभार योगेश वाणी यांनी मानले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!