Type to search

जळगाव

माजी आमदारांचे मानसपुत्र विधानसभेसाठी इच्छुक

Share

पारोळा । योगेश पाटील

येथील मंगरूळ-शिरसमणी गटाचे जि.प. सदस्य व माजी आ.चिमणराव पाटील यांचे मानसपुत्र समजले जाणारे डॉ.हर्षल माने येणार्‍या विधानसभेसाठी इच्छुक असल्याची व त्यांना राष्ट्रवादी, सेनेच्या पं.समिती सदस्यांचा पाठींबा असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी डॉ.हर्षल माने, राष्ट्रवादीचे पं.समिती उपसभापती ज्ञानेश्र्वर पाटील, सदस्य अशोक नगराज पाटील, शिवसेना सदस्य प्रमोद जाधव, छाया पाटील यांच्या वतीने त्यांचे पती राजेंद्र पाटील, रेखाबाई रमेश भिल यांच्या वतीने त्यांचे दीर दत्तात्रय गायकवाड उपस्थित होते.

यावेळी आपली भूमिका मांडताना डॉ. माने यांनी स्पष्ट केले, की आपण शिवसेना किवा भाजपकडून विधानसभेसाठी इच्छुक असून याबाबत दोन्ही पक्षांकडे तिकीट मागणी करत असून यातील कोणत्याही पक्षाकडून तिकीट मिळाल्यास आपली दावेदारी राहणार असून व गरज भासल्यास परिस्थितीजन्य निर्णय घेतला जाईल, असे संकेत दिले.

यावेळी पत्रकारांनी तिकीट न मिळाल्यास आपली भूमिका काय राहील? असा प्रश्र्न मांडला असता याबाबत आपण युती झाल्यास युतीच्या उमेदवाराचा व न झाल्यास सेनेच्या उमेदवाराच्या पाठीमागे राहू असे स्पष्ट केले.

तर राष्ट्रवादी व शिवसेनेच्या सदस्यांना विचारण्यात आले, की एकीकडे राष्ट्रवादी व शिवसेनेचे उमेदवार हे निश्र्चित असताना आपली भूमिका काय राहील? यावर डॉ माने यांची उमेदवारी राहिल्यास आम्ही सर्व त्यांच्या सोबत राहणार असून यासाठी आम्हाला पक्षाच्या विरोधात देखील काम करावे लागले तरी ते केले जाईल तसेच पक्षाने उमेदवारी न दिल्यास आमचा आग्रह त्यांनी अपक्ष उमेदवारी करावी, असा राहील. यावेळी उपस्थित सदस्यांनी डॉ हर्षल माने यांना पाठींबा देत असल्याचे पत्र पत्रकार परिषदेत दिले.

एकंदरीत पाहता सद्यस्थितीत पक्ष अंतर्गत कुरबुरी एरंडोल- पारोळा मतदार संघात अडचणी वाढल्या असून कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मनोगतात नगरअध्यक्ष करण पवार यांना आपला आशीर्वाद आहे का? असा थेट प्रश्र्न जनतेला विचारून एक प्रकारे त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्याची तालुक्यात चर्चा सुरु आहे. मात्र जळगाव येथील पत्रकार परिषदेत युती होणारच, असा दावा केल्याने जनतेमध्ये संभ्रम पसरत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!