Type to search

जळगाव

गाळेधारकांबाबत अचानक निर्णय होण्याची शक्यता

Share

जळगाव । मनपा हिताचे निर्णय सध्या एकापाठोपाठ घेतले जात असल्याचे मनपा गोटात दिसून येत आहे. मनपा अधिक सशक्त कशी बनेल, याबाबत विचार करण्यात येत असून सत्ताधार्‍यांसह आमदार, प्रशासनीक अधिकारी त्यादृष्टीने पाठपुरावा करीत आहेत.

जिल्हा बँक पाठोपाठ हुडकोच्या कर्जातून मनपा मुक्त झाली. हे निर्णय अचानकच झाले. तसेच अतिक्रमणाचा विषय असो की शिक्षकांना देण्यात येणारे पेन्शन याबाबतही अचानक निर्णय झाले, मनपाची खाते सील झाली होती. त्यातूनही मार्ग शेवटी काढलाच. मनपा कर्मचार्‍यांना शिस्त लागली, प्रत्येकाकडे ओळखपत्र दिसू लागले. एकमुस्त ठेका मार्गी लागला आहे, मलनि:सारणचा ठेकाही काही दिवसात मार्गी लागणार आहे. ठेकेदारांना त्यांच्या कामांचे पैसे मिळू लागले आहेत. आता कोणताही निर्णय केव्हाही होवू लागला आहे. अशातच आता प्रतीक्षा आहे ती गाळेधारकांवरील कारवाईची.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!