Type to search

जळगाव राजकीय

जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा भाजपाची सत्ता येईल

Share

खंडाळा/ खडका, ता.भुसावळ । वार्ताहर – येणारे सरकर हे भाजपाचेच राहील. महाजनादेश यात्रेचा कौल व जनेता उत्साह यावरुनच हे स्पष्ट होत आहे. आघाडी सरकरने इतक्या वर्षा जे नाही केले. भाजपा सरकरने देशात व महाराष्ट्रात करुन दाखविले आहे. भाजपा जनतेची नाळ ओळखणारे व शेतकर्‍याचे सरकार आहे. यावेळी आ. एकनाथराव खडसे, ना. गिरीष महाजन आ. संजय सावकारे यांच्यावर विश्वास ठेवून भाजपाला भरभरुन करा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री यांची महाजनादेश यात्रा खंडाळा परिसरातून रवाना झाली.यावेळी त्यांनी परिसरातील खडका गावापासून महाजनादेश यात्रेला सुरुवात झाली. यावेळी प्रत्येक गावात ढोलताशे व फटाक्यांच्या गजरात यात्रेचे स्वागत केले. यावेळी गावांतील बालकांपासून तर जेष्ठांपर्यंत महिला पुरुष, पदाधिकारी व अधिकारी स्वागतासाठी हजर होते.त्यांनी या गावांमध्ये 10-15 मिनिटे ग्रामस्थाशी संवाद साधला. यात्रे दरम्यान, किन्ही येथील सर्वोदय हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची गर्दी व घोषणा ऐकून विद्यार्थ्यांचे आभार मुख्यमंत्री यांनी मानले.खंडाळा गावात महाराणा प्रताप प्रवेशद्वार पाहून त्यांनी गावाची स्तृती केली.

गेल्या तीन दिवसांपासून खडका, किन्ही, खंडाळा, मोंढाळा, शिंदी, विचवा या गावांतील सरपंच, ग्रा.पं. व गावकर्‍यांनी दिवाळी सणासारखे मुख्यमंत्र्याचे स्वागतासाठी गावे सजविले होते. व ते सर्व गावे भाजपाच्या झेंडे व बॅनर्समुळे भाजपामय झाले होते. दरम्यान मोंढाळा येथील सभेत, लवकरच व राज्य विशेषत: ग्रामिण भाग लवकरच हगणदरी मुक्त होईल असा विश्वास व्यक्त केला.

टाळ मृदुंगात स्वागत-दरम्यान, परिसरातील गावांमधील महिला व पुरुष भजनी मंडळ, शाळकरी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका, यांनी टाळ मृदुंग व हरिनामाच्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना हात अभिवादन केले.

खडका- येथे सकाळी 11 वा. महाजनादेश यात्रा गावात दाखल होताच ढोलताशे व फटाक्यांची अतिषबाजी करण्यात आली. यावेळी साईबाबा मंदीरासमोर रथ थांबवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी सोबत माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, आ. संजय सावकारे यांची उपस्थिती होती.प्रसंगी सरपंच पद्माबाई चौधरी यांनी त्यांचा सत्कार केला. निवेदन तसेच आपल्या मानधनातून 21 हजार रुपयांचा चेक पुरग्रस्तांसाठी दिला. यावेळी पं.स. सभापती प्रीती पाटील, गोलू पाटील, उपसरपंच अनिल महाजन, चुडामण भोळे, दीपक भिरुड, शरदसिंग पाटील, अनिल वारके, शब्बीर बागवान, राष्ट्रवादीचे विजय अवसरमोल, दारासिंग पाटील, संदीपसिंग पाटील, पो.पा. सुरतसिंग पाटील, धना महाजन यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!