Type to search

जळगाव

महावितरणच्या दोघांना ऍन्टी करप्शनचा शॉक

Share

जळगाव | रिप्लेसमेंट म्हणून नवीन विद्युत मीटर बसवून देण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून दोन हजार रुपयांची लाच स्विकारणार्‍या कनिष्ठ अभियंत्यासह मक्तेदार व पंटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी सायंकाळी रंगेहाथ अटक केली.

तक्रारदार याच्या मालकीचे घरगुती विद्युत मीटर जळाल्याने त्याना रिप्लेसमेंट म्हणून नवीन विद्युत मीटर देण्याच्या मोबादल्यात नाशिराबाद ग्रामीण कक्षाचे कनिष्ठ अभियंता दिपक केशव पाटील (वय ३२ रा. खेडी) यांनी पंटर निलेश दामु जाधव (रा. अयोध्या नगर) याच्या मध्यस्थीने तक्रारदाराकडे दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदार याने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपविभागीय अधिकारी गोपाल ठाकूर यांची भेट घेवून तक्रार दिली.

या तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर तक्रारदार खाजगी मक्तेदार नितीन गोंविदा परदेशी (रा. प्रियदर्शनी अपार्टमेंटच्या बाजुला, प्रभात चौक) याला तक्रारदार यांच्याकडून दोन हजार रुपयांची रक्कम घेतांना डीवायएसपी गोपाल ठाकूर, निरीक्षक निलेश लोधी, मनोज जोशी, जर्नादन चौधरी, प्रशांत ठाकूर, प्रविण पाटील, नासिर देशमुख, ईश्‍वर धनगर यांनी रंगेहाथ अटक केली. कनिष्ठ अभियंता दिपक पाटील, पंटर निलेश जाधव व मक्तेदार नितीन परदेशी या तिघांविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!