Type to search

जळगाव

सावखेड्याजवळ एक ठार

Share

धरणगाव । तालुक्यातील चोपडारोडवर असलेल्या निशाने फाट्याजवळ मोटरसायकल व पॅजो रिक्षा यात झालेल्या अपघातात सावखेडा (ता.चोपडा) येथील युवक ठार झाल्याची घटना दि.14 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली.

सावखेडा येथील नीलेश उर्फ बंटी प्रकाश कदम (मयत) (वय 22) व कृष्णा भगवान भील (वय 25) हे दोघे धरणगावकडून सावखेडाकडे जात असताना चोपड्याकडून खान्देशी शेवचे चालक फुलझाडे हे पॅजो रिक्षा घेवून धरणगावकडे येत होते. यावेळी दोघा गाड्यांची समोरासमोर धडक झाली. यात मोटार-सायकलवर स्वार नीलेश कदम (पाटील) हा जागीच ठार झाला. तर त्याचा साथीदार कृष्णा भील हा गंभीर जखमी झाला. तसेच पॅजोमधील संतोष नथ्थू महाजन व सुरज राजूसिंग परदेशी (रा.धरणगाव) हे जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच स.पो.नि.पवन देसले यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. जखमीवर ग्रामीण रुग्णालयात डॉ.तुषार जोगी, प्रवीण चव्हाण, फरिदाबी खान, अरुण सोनवणे, अविनाश चौधरी, यांनी उपचार केले.

मयत नीलेश कदम हा एकुलता एक मुलगा असल्याने सावखेडा गाव सुन्न झाले. गेल्या महिन्यात त्याच्या वडिलांचे बायपास झाले आहे.तो पुण्याला कामाला होता. चार ते पाच दिवसांपूर्वी तो गावी आला होता. त्याच्या पश्चात आई-वडील, तीन बहिणी असा परिवार आहे. दि.15 मंगळवारी नीलेशवर अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!