Type to search

जळगाव

वाहतुकीसाठी शालेय स्तरावर परिवहन समिती स्थापन करा!

Share

जळगाव | प्रत्येक शाळेतील मुलांची सुरक्षितपणे वाहनातून ने-आण करणे, परिवहन शुल्क, बस थांबे निश्‍चित करणे, वाहनाची कागदपत्रे, चालकाचे लायसन्स, बॅच, नोंदणीप्रमाणपत्र, प्रथमोपचार पेटी आदी बाबींकडे लक्ष देण्यासाठी संबंधित प्रत्येक शालेय स्तरावर एक परिहवन समिती स्थापन करण्यात यावी अशी सूचना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी मुख्याध्यापकांना दिल्या.

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसंदर्भात शहरात व जिल्ह्यात स्कूलबसकरीता विनिमय २०११ मधील तरतूदींची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. अधिकृत परवान असलेल्या व सुरक्षेच्या दृष्टीने यथायोग्य असलेल्या स्कूलबसमधूनच विद्यार्थ्यांची वाहतूक होण्याच्या दृष्टीने व शाळेच्या मुख्याध्यापक व प्राचार्य यांच्यामध्ये याबाबतची जनजागृती होण्याच्या दृष्टीने जिल्हा स्कूलबस सुरक्षितता समितीच्यावतीने शालेय विद्यार्थी सुरक्षित वाहतूक या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांचे सुमारे ५०० मुख्याध्यापक सहभागी झाले होते. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे सीईओ बी.एन.पाटील, अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी डी.एम.देवांग, माध्यमिक शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक राकेश शिरसाठ, कर वसुली अधिकारी सी.एस.इंगळे, ए.एम.पाटील आदी उपस्थित होते. सुरुवातीला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना विद्यार्थी सुरक्षित वाहतुक व नियमावली संबंधित संगणकाद्वारे विस्तृत मार्गदर्शन व प्रबोधन केले. सद्यस्थितीत बहुतेक शाळेच्या विद्यार्थ्याची वाहतूक खाजगी व असुरक्षित वाहनातून अत्यंत धोकादायक पध्दतीने व बेदरकारपणे होत असल्याचे दिसून येत आहे. बहुतेक खाजगी वाहनधारक त्यांचे वाहनात क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी कोंबून धोकेदायक पध्दतीने वाहतूक करीत असून याकडे पालकांचे व शालेय व्यवस्थापनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. ही बाब अत्यंत धोकेदायक असून गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे.

बसची होणार तपासणी
पोलीस, परिवहन व शिक्षण विभागातील अधिकार्‍यांची समिती तयार करून जिल्ह्यातील ज्या ज्या शाळेमध्ये अधिकृत परवान्यावरील स्कूलबसेसद्वारे विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते अशा शाळांची तपासणी करण्यात येणार आहे. तपासणी करतांना स्कुलबसेसची संख्या, स्कुल बसची गुणवत्ता, चालकाचे चारित्र्य, महिला सहवर्ती यांची उपलब्धता, मुलांना चढ-उतार करण्याकरीता जागेची उपलब्धता व इतर सोयीसुविधा यांचा समावेश करण्यात येईल.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!