Type to search

Breaking News जळगाव मुख्य बातम्या

सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?

Share

जळगाव । भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजप सरकारवर पुन्हा एकदा शाब्दीक हल्ला चढवीला आहे. शेतकरी कर्जमाफीचे व्याज जिल्हा बँकेने भरावे, अशा सूचना सरकारकडून एका परिपत्रकाद्वारे करण्यात आल्या आहेत. खडसेंनी सरकारच्या या निर्णयावर चांगलीच आगपाखड केली. ’सरकारचे डोकं फिरले आहे का, सरकारने बँकांना मदत करायची सोडून व्याजाचा भुर्दंड त्यांच्यावर टाकला आहे. सरकारच्या अशा धोरणांमुळे बँका अजून खड्ड्यात जातील अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 103वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी बँकेच्या आवारात पार पडली. या सभेत खडसे बोलत होते.यावेळी खडसे म्हणाले की, कर्जमाफीबाबत सरकारचे धोरण अद्यापही स्पष्ट नाही. त्यामुळे सर्वत्र बुचकाळ्यात पडण्यासारखी परिस्थीती आहे.सरकार सुरूवातीला म्हणाले होते. 50 हजारापर्यंत कर्जमाफी देऊ नंतर 1 लाखापर्यंत कर्जमाफी केली. त्यानंतर मुलाला देणार नाही, आता सरकार म्हणतेय सरसकट कर्जमाफी देऊसरकारच्या अशा निर्णयामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.

येणार्‍या विधानसभा निवडणूकीत सर्वांनीच सरकारला धारेवर धरले पाहीजे असेही खडसे म्हणाले. येत्या दोन दिवसानंतर मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा जिल्हयात येत आहे. त्यावेळी आपल्या भाषणातून मुख्यमंत्र्यांसमोर हा विषय मांडणार असल्याचेही खडसे यांनी सांगीतले. शेतकरी कर्जमाफीचे व्याज जिल्हा बँकेने भरावे असे सरारचे म्हणणे आहे. मात्र एवढी मोठी रक्कम जिल्हा बँक कशी भरू शकते. सरकारच्या अशा निर्णयामुळेच जिल्हा बँकेचा एनपीए 9 टक्कयावरून 41 टक्कयांपर्यत गेला आहे. बँकेने व्यवस्थापनाच्या खर्चात कपात करून एनपीए 5 टक्कयांपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र सरकारमुळे ते शक्य झाले नसल्याची आगपाखडही खडसे यांनी यावेळी केली.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!