Type to search

जळगाव

इंद्रप्रस्थनगर, प्रजापतनगरातील बंद घरे टार्गेट

Share

जळगाव । शहरात गेल्या 4 दिवसांपासून चोरी, घरफोडीच्या घटना उघडकीस येत आहे. चोरट्यांनी शहरात धुमाकूळ घातला असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यातच शिवाजीनगर भागातील इंद्रप्रस्थ नगर व प्रजापत नगरातील बंद घरे फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवून नेल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती कळताच शहर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून माहिती जाणून घेतली. श्वानपथक व ठस्से तज्ञांनी नमुने घेतले.

याबाबत प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेली माहिती अशी की, इंद्रप्रस्थ नगरातील रहिवाशी मनोज पुंडलिक तिळवणे हे जैन इरिगेशन कंपनीत कामाला आहे. मनोज तिळवणे हे दि.17 रोजी बर्‍हाणपूर येथे सासरी गेले होते. त्यामुळे त्यांचे घर बंद होते. घर बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी मध्यरात्री मुख्य दरवाज्याचा कडीकोयंडा तोडून कपाटातील जवळपास 40 हजार रुपये रोख व सोन्या-चांदीचे दागिने असा लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवून नेला. सोमवारी सकाळी तिळवणे कुटुंबिय घरी आल्यानंतर त्यांना मुख्य दरवाज्या उघडा दिसला. तिळवणे घरात गेल्यानंतर त्यांना घरातील सामान अस्तावस्त फेकलेला दिसून आल्याने घरात चोरी झाल्याचे समजून आले. त्यानंतर तिळवणे यांनी तात्काळ या घटनेची माहिती शहर पोलीसांना दिली.

चोर्‍या, घरफोड्यांचे सत्र सुरुच
शहरात चोरी, घरफोडीचे सत्र सुरुच असून चोरट्यांनी बंद घरे टार्गेट केली आहे. चोरट्यांची दिवसेदिवस मुजोरी देखील वाढत असून भरदिवसा बंद घरांमध्ये चोरीच्या घटना मागील काही दिवसांमध्ये घडल्या आहे. चोरट्यांपुढे पोलीस यंत्रणा हतबल झाली असून एकही चोरट्यांपर्यंत पोहचण्यास पोलीसांना यश आलेले नाही.

शहर पोलिसांची घटनास्थळी धाव
शहर पोलीसांची घटनास्थळी धाव घटनेची माहिती कळताच शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी याठिकाणी धाव घेवून माहिती जाणून घेतली. घटनास्थळी श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले होते. तसेच ठस्से तज्ञांनी देखील नमुने घेतले. याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

बंद घरांवर चोरट्यांचा डोळा
प्रजापत नगरातील सुनंदिनी पार्कमध्ये धर्मेश भोजराज पांडव यांचे घर आहे. धर्मेश पांडव हे ऑटो आयकॉनमध्ये व्यवस्थापक म्हणून कामाला असून त्यांचे आईवडील यावल तालुक्यातील म्हैसवाडी येथे राहतात. दि.16 रोजी रात्री धर्मेश यांच्या आईचे निधन झाले असल्याने पांडव कुटुंबिय गावाकडे गेले होते. त्यामुळे त्यांचे घर बंद होते. चोरट्यांनी घरी कोणीही नसल्याचा फायदा घेत चोरटयांनी घराच्या कपाऊंडमध्ये प्रवेश करून खिडकीवर चढत बाहेरील लाईट फोडला. त्यानंतर मुख्य दरवाज्याचे कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला.चोरट्यांनी घराच्या कपाटातील 1 हजार रुपये रोख व गॅस हंडीसाठीचे 500 रुपये चोरुन नेले. सोमवारी सकाळी गॅस हंडीवाला घरी हंडी घेवू आल्यानंतर त्याला घराचा दरवाजा उघडा दिसला. आवाज देवून कोणीही न आल्याने हंडीवाल्याने शेजारील महिलेला विचारणा केली. महिलेने पांडव कुटुंबिय बाहेरगावी गेले असल्याचे सांगितल्याने हंडीवाल्याने दरवाजा उघडा असल्याचे महिलेला सांगितले. त्यानंतर पांडव यांच्या घरात चो झाल्याचे समजून आले. पांडव कुटुंबिय गावी गेले असल्याने घरातून नेमका किती ऐवज चोरीला गेला हे समजून आलेले नाही.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!