Type to search

जळगाव

बालिका अत्याचारप्रकरणी कलेक्टोरेटवर आक्रोश मोर्चा

Share

जळगाव । चोपडा तालुक्यात वैजापूर येथे आदीवासी समाजातील एकाचा कुटूंबातील दोन अल्पवयील मुलींवर ईश्वर मोरे नामक नराधमाने अत्याचार केल्याची घटना घडली तर चाळीसगाव तालुक्यातील बोढरे येथील आठ वर्षीय बालकाचे अपहरण करून निघृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणात संशयीतांना कडक शासन करण्याची मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आदीवासी विद्यार्थी परीषदेतर्फे विद्यार्थी मोर्चा काढण्यात येवून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे कि, बोढरे येथील बालकाचे अपहरण 29 जून 2019 रोजी झाल्यानंतर हरवल्यासंदर्भात संबधित कर्मचारी व ठाणे अंमलदार यांनी तक्रारदारांचे म्हणणे ऐकून नघेता हाकलून लावले होते,त्यानंतर 5 जुलै रोजी बालकाचे प्रेत आढूळून आले होते, कर्मचार्‍यांनी वेळीच लक्ष दिले असते तर बालकाचे प्राण वाचू शकले असते. तर चोपडा तालुक्यातील अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणार्‍या नराधमास कडक शासन झाले पाहीजे यासाठी अ‍ॅट्रासिटीचा गून्हा दाखल करून आरोपी नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी या संदर्भात पिडीतांच्या कुटूंबियांंना नुकसान भरपाई देण्यात येवून मनोधैर्य योजनेंतर्गत समाजकल्याण विभागाकडून तात्काळ लाभ देण्यात यावा या खटल्यासाठी विशेष सरकारी वकिल म्हणून अ‍ॅड. निकम यांची नेमणूक करण्यात यावी या दोनही प्रकरणात न्याय न मिळाल्यास आदीवासी संघटना न्याय मिळेपर्यत आंदोलन करतील असा ईशारा देण्यात आला आहे.या निवेदनावर बारेला नकाराम, बारेला दिलीप,बारेला धनीराम,बारेला मनोज,बारेला वकील,बारेला भगवान,बारेला अंतीराम,बारेला कैलास, देशमुख महेंद्र,पवार तुळशिदास,मडावी शुभम,राहसे राकेश, ठाकरे दारासिंग,बारेला सकाराम आदी विद्यार्थ्याच्या सह्या आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!