Type to search

जळगाव

व्याजाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा

Share

जळगाव । विधानसभेच्या बैठकीत कर्जमाफीनंतरचे शेतकर्‍यांचे व्याज जिल्हा बँकेने का भरावे, कर्जमाफी शासनाने केली त्याप्रमाणे व्याज देखील शासनाने दिले पाहिजे. 70 ते 75 कोटी रुपये व्याज जिल्हा बँकेसह संचालकांचा विरोध आहे. पुढचे कर्ज देण्यास बँकेतर्फे बंद करण्यात आले आहे. व्याजाचा विषय मार्गी लागला नाही म्हणून जिल्ह बँक हायकोर्टात दावा दाखल आहे. व्याज शासनाने भरण्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री जळगाव दौर्‍यावर येत आहेत, त्यावेळी चर्चा करणार असल्याचे माजी महसूल तथा आ.एकनाथराव खडसे यांनी जिल्हा बँकेच्या प्रशासकिय आवारात झालेल्या 103 व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत सांगीतले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, गेल्या वेळी कर्जमाफीसंदर्भात बँकेने शासनाच्या अभिनंदनाचा ठराव केला होता, परंतु नंतर वेळोवेळी कर्जमाफी निकषात वेळोवेळी होणार्‍या बदलामुळे व कर्जमाफीनंतरचे बँकेने व्याज द्यावे यामुळे 9 टक्केच्या आत असलेला बँकेचा एनपीए वाढणार आहे. यास सर्व संचालकांसह विविध कार्यकारी सोसासटयांचे चेअरमन यांचा विरोध असल्याने यावेळी मात्र शासनाचा निषेधाचा ठराव केला असल्याचे सांगीतले. यावेळी जिल्ह्याभरातून 100 टक्के पीककर्ज वसुली केली असल्याने 10 विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन व सदस्यांचा सत्कार मान्यवरांच्याहस्ते करण्यात आला. तसेच सचिवांचा देखील यात हातभार असल्याने त्यांचा देखील सत्कार करण्यात येईल असे कार्यकारी संंचालक जितेंद्र देशमुख यांनी सांगितले.

डिव्हिडंट अद्याप वाटप झालेले नाही
विकासोकडून सोसायट्यांचा भरणा केलेल्या रक्कमा पावत्या अजूनही मिळालेल्या नाहीत. सोसायट्यांंचे डिव्हिडंंट दिलेले नाहीत. कोणताही सातबारा कोरा असल्याशिवाय कोणतेही कर्ज मिळत नाही. हेक्टरी 41 हजार रूपये मर्यादेपोटी लाखोंची जमीन तारण दिली जाते. परंतु, कर्जमर्यादा वाढविली जात नाही. राष्ट्रीयीकृत बँक मर्यादा न पाहता कर्ज देतात त्यामुळे बँकेसह सोसायट्यांंचे सभासद इतर ठिकाणी वळले आहेत. वार्षिक अहवालात त्रुटी आहेत. 2 कोटीचा अपहार याचा खुलासा करावा, कृष्णापुरी विकासोने एटीएमव्दारे कर्जवाटप प्रकिया केली. तारखेडा, ता पाचोरा विकासोने सभासदांच्या सेव्हींग खात्याव्दारे वाटप केले, असा भेदभाव का? केला जातो. गेल्या 25 वर्षापैकी यावेळीच 50 टक्के कर्जवाटप का करण्यात आले,असा प्रश्न कोचूर येथील मनोहर येवले, मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा येथील अनंतराव देशमुख यांनी मांडला .

टिश्यूकल्चर कर्जवसुली संदर्भात नाबार्डचे ताशेरे
ा गेल्या 15 दिवसांपासून संगणकीय व्यवहार बंद असल्याने व्यवहार ठप्प आहेत. बचत सेव्हीग खातेधारकांची न्यूनतम शिल्लक मर्यादा एक रूपये पेक्षा कमी असल्यास त्यावर सहा महिन्यात व्यवहार न झाल्यास कपात करण्यात येते. तसेच टिश्यूकल्चर कर्जवसुली संदर्भात नाबार्डने ताशेरे ओढले आहेत. जॉईट रजिस्ट्रार यांनी स्थगिती तर डिडिआरकडे सुनावणी सुरु असून 23 कोटी रूपये भरणा झालेला आहे. याचा शेवटपर्यत पाठपुरावा सुरु असून त्यात 7 कर्मचारी व 11 सचिवांना घरी पाठवण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. बँकेने गेल्या आर्थिक वर्षात सर्व प्रकारच्या ठेवी 3266 कोटी 37 लाख असून ढोबळ नफा 53 कोटी,75 लाख झालेला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत ठेवींमध्येे 279 कोटी 74 लाखांनी वाढ झाली. बँकेने रिझर्व्ह,नाबार्डने निर्धारीत केलेल्या प्रमाणापेक्षा राखता व तरलता राखलेली आहे.

अ‍ॅड. पाटील यांचा संताप
बँकेचा अहवाल अजूनही काही सभासद सदस्य सोसायट्यांचे चेअरमन यांच्यापर्यंत पोचला नाही. बँकेची बैठक असल्याने अहवाल हाती नसताना दैनिकांच्या बातम्यांमधून सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली हे वाचायचे का? असा प्रश्न करून चेअरमन, सदस्यांचा हा अपमान आहे. सर्व सभासद सदस्यांना अहवाल हाती येईपर्यत ही बैठक रद्द करून नव्याने बैठक घ्या , असा पवित्रा चाळीसगाव तालुक्यातील विकासो चेअरमन अ‍ॅड.पाटील यांनी घेतला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!