Type to search

जळगाव

डिव्हाईडरच्या कामांमुळे अडथळे

Share

जळगाव । शहरात दिवसेंदिवस वाहनांची वर्दळ वाढू लागली आहे. शहर झपाट्याने वाढत आहे. आजमितीस शहरात साडेपाच लाख लोकसंख्या आहे. शहरातील गणेश कॉलनी ते रिंगरोड चौक व रिंगरोड चौक ते कोर्ट चौकापर्यंत रस्त्यांवर डिव्हाईडर टाकले जातायेत, शहरातील जिल्हा परिषद ते फुले मार्केट तसेच टॉवर चौक ते चित्रा चौक व चित्रा चौक ते राजकमल टाकीज चौक असे डिव्हाईडर टाकण्याचे काम सुरू आहे तर काही ठिकाणी डिव्हाईडर टाकण्यात आलेले आहेत.

रिंगरोड चौफुली ते गणेश कॉलनी चौफुलीपर्यंत डिव्हाइडर टाकण्याचे काम सुरू आहे. याच रस्त्यावर महत्वाची केंद्रे, प्रतिष्ठाने, क्लासेस आहेत. त्यामुळे रस्त्यावर दुतर्फा वाहनाचीच गर्दी असते, चक्क रस्त्यावरच वाहने लागलेली असतात. यास जबाबदार कोण, जेथे रस्त्यावर वाहने लागलेली असतात ती केंद्रे, प्रतिष्ठाने, क्लासेस की महानगरपालिका याबाबत जनता आता जाब विचारू लागली आहे.

डिव्हाईडरमुळे समस्येत वाढ
या रस्त्यांवरची वाहतुकीसह इतरही डिव्हाईडर असलेल्या रस्त्याच्या ठिकाणी वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. ऐरव्ही मोठे दिसणारे रस्ते हे डिव्हाईडरमुळे अरुंद बोळीसारखे दिसू लागले आहेत. वाहने चालवितांना डिव्हाईडरपूर्वी जी मोकळीकता वाहनधारकांना दिसत होती ती आता दिसेनासी झाली आहे. विशेष म्हणजे रिंगरोड चौफुली ते गणेश कॉलनी चौफुलीपर्यत अनेक ठिकाणी डिव्हाईडरमुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहने लागलेली असतात.

पार्किंग झोन आवश्यक
शहरात रस्त्यांवर डिव्हाईडर टाकण्याच काम सुरु आहे. ते वाहतुकीसाठी अडसर ठरू लागला आहे. बहुतेक वाहने ही रस्त्यावरच लागलेली असतात. यासाठी रस्त्यावर ही वाहने लागू देवू नये, त्यासाठी पार्किंग झोन करण्यात यावे, शहरातील स्पॉट फिक्स करुन वेगवेगळ्या भागात पार्किंग झोन उभारले गेल्यास वाहने एका ठिकाणी लागू शकतात. शहराच्या मुख्य रस्त्यांवर डिव्हाईडर टाकण्याचे काम करण्यात येत आहे.

दुर्दैवी घटना टाळा…
वाहनांमुळे मोठा असलेला रस्ता अरुंद झाला आहे. यामुळे वाहतुकीस अडथळा वाढला आहे. काही वेळेस तर दोन वाहने एकाच वेळी पास होत नाहीत, अशा वेळी वाद विवाद हे नित्याचेच होतात, डिव्हाईडर टाकण्यात येत असले तरी ही बाब शहराच्या दृष्टीने व विकासाच्या दृष्टीने महत्वाची असली तरी मात्र रस्त्याच्या वाहतुकीकडे अद्याप कोणीही लक्ष दिलेले दिसत नाही, मनपानेही दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे, शहर वाहतूक शाखेनेही गांभीर्याने याकडे लक्ष द्यावे असेही नागरिकांत बोलले जात आहे. उद्या या रस्त्यावर काही छोटी मोठी घटना झाली, अपघात झाला तर त्यास जबाबदार रहाणार कोण असाही सूर व्यक्त होवू लागला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!