Type to search

जळगाव

अट्रावलात 7000 केळींची खोडे कापली : 10 लाखांचे नुकसान

Share

यावल । तालुक्यातील अट्रावल येथे रहिवासी सुधाकर पाटील यांच्या शेतातील 7000 केळीची खोडांचे ऐनकाटणवर आलेल्या बागेची कोणीतरी माथेफिरूने ट्रॅक्टर फिरून सुमारे आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान केल्याची घटना दि. 13 ऑक्टोबरच्या रात्री घडली. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

अट्रावल तालुका यावल येथील सुधाकर बळीराम पाटील यांचशेत रवींद्र बळीराम कोल्हे,अट्रावल यांनी सन 2016 ते 2020 पर्यंत पाच वर्षे करार नाम्याने गट नंबर 924 /923 यावल शिवार हे शेत दहा हजार रुपये बीघ्या प्रमाणे केलेले होते. त्यात 7000 केळीचे पिल बाग ऐनकाटनवर असलेले दि. 13 चे रात्री अज्ञात इसमाने ट्रॅक्टर फिरवून जमीनदोस्त केले. त्यात रवींद्र बळीराम कोल्हे यांचे सुमारे आजच्या केळीच्या भावानुसार दहा ते बारा लाखाचे नुकसान झाले आहे. शेत हे अट्रावल ते यावल रस्त्यावर गावापासून दोन किलोमीटर अंतरावर नदीकाठी आहे. याबाबत सकाळी ते शेतात गेले असता सदर प्रकार त्यांच्या निदर्शनास आला . मळयामध्ये नेमके कोणी ट्रॅक्टर फिरवले? असेल हा माथेफिरू आहे तरी कोण? ऐन शेतकर्‍यांच्या तोंडचा घास आलेला का? हिरावला गेला.

याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार दिली मात्र नेमका हा प्रकार कोणी केला असावा? असा प्रश्न पोलिसांनी विचारल्याने त्यांनी हे कोणी केले हे आम्हाला माहीत नाही असे रवींद्र कोल्हे यांनी सांगितले ज्या माथेफिरूने केळी जमीनदोस्त केली त्यामधील ठिबक व पाईप याचीसुद्धा नुकसान झाले असून केळीचे सुरुवातीपासून आतापावेतो दोन ते अडीच लाख रुपयांचे मटेरियल व मशागतीसाठी लागलेला खर्च व शेतकर्‍यांनी आजपर्यंत केलेली मेहनत ही वाया गेलेली आहे.

मे महिन्याच्या चक्क कडक उन्हामध्ये परिसरात गेलेले भूगर्भातील पाण्याची पातळी त्यासाठी रात्रंदिवस शेतात थांबावे लागत होते. पोटच्या पोराप्रमाणे केळीला जपली असताना एवढे माझे नुकसान कोणी? केले असावे असे डोळ्यातील पाणी अश्रू अनावर नव्हता रवींद्र कोल्हे यांनी सांगितले नेमकी आता पोलिस गुन्हा दाखल करतात का?दाखल झाल्यावर आरोपीच्या मुळापर्यंत शोध होतो का? याकडे लक्ष लागून आहे. या प्रकारामुळे शेतकर्‍यांमध्ये एकच खळबळ निर्माण झालेली असून रात्रीची शेत शिवारात वीज पुरवठा बंद झालेला असतो त्यामुळे कोणीही शेतकरी शेतामध्ये राहत नाही त्यामुळेच अशा चोरट्यांना व नुकसान करणार्‍या कुप्रवृत्तीला चालना मिळत असून शासनानेही आता चोवीस तास वीज देऊन शेतकर्‍यांना दिलासा देणे गरजेचे आहे असे आता शेतकर्‍यांतून बोलले जात आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!