Type to search

जळगाव

निवडणुकीमुळे खरीप पिकांच्या नुकसानीकडे प्रशासनाची पाठ

Share

जळगाव । जिल्हा परीसरात यावर्षी सरासरीपेक्षा दिड ते दोन पट पाउस अधिक झाला असल्याच्या दैनंदिन नोंदी प्रशासकिय आकडेवारीनुसार आहेत. जिल्हयाचे पर्जन्यमान 9949.4 म्हणजेच सरासरी 663.3 मि.मी इतके अपेक्षीत आहे. असे असले तरी 27जुलै दोन,9ऑगस्ट चार, 27 ऑगस्ट रोजी तीन तालुक्यात अतिवृष्टि झाल्याची नोंद आहे. तर संपूर्ण जिल्हयात 9 व 10 सप्टेबर दरम्यान वादळी वार्‍यांसह 200ते250 मि.मी.अतिवृष्टिचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला होता.

त्यानुसार 411.4 मि.मी पावसाची नोंद एकाच दिवशी असे तीन ते चार वेळा अनेक महसुली मंडळात अतिवृष्टि होउनही अद्याप महसुल विभागाकडून पंचनामे होवून प्रस्ताव पाठवणे गरजेचे असूनदेखील प्रशासनाने पाठ फिरवली असल्याने सर्वसामान्य शेतकर्‍यांचे अतिवृष्टिमुळे झालेेले खरीप पिकांचे नुकसानीचे पंचनामे हा मुद्दा अवघड जागेचे दुखणे झाले आहे. मात्र शेजारच्या नाशिक जिल्हाधिकार्‍यांनी या संदर्भात तातडीने पाठपुरावा करून शासनस्तरावर प्रस्ताव देखिल पाठविला असल्याचे देखिल चर्चा आहे.

नुकसानीचे प्रस्ताव पाठविण्याची मागणी
एखाद्या भागात अतिवृष्टी होऊन पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान होते. परंतु, महसुली सर्कलमध्ये 65 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला नसल्यास ती अतिवृष्टी मानली जात नसल्याने अनेक महसुली मंडळातील शेतकर्‍यांना झळ बसते. भौगोलिक क्षेत्रनिहाय पावसाचे प्रमाण कमी-अधिक असल्याने निकषात समाविष्ट होत नाही. परिणामी, प्रत्यक्षरित्या नुकसान झाले असले तरी नुकसानग्रस्त शेतकरी शासकीय मदतीसह पीक विम्याच्या भरपाईसाठी पात्र ठरू शकत नाही. त्यामुळे अतीवृष्टिचे निकष देखिल कालमानस्थितीनुसार बदल करुन नैसर्गीक आपत्ती नुसार नुकसान भरपाईचा प्रस्ताव शासनस्तरावर पाठवावा अशी मागणी सर्वच तालुक्यातुन करण्यात येत आहे.

तीन ते चार वेळेस अनेक मंडळांत अतिवृष्टीची नोंद
यावर्षी सुरूवातीपासूनच दहा ते पंधरा दिवसांचा खंड घेत ऑगस्टच्य मध्यापर्यत हुलकावणी दिली होती. तर नंतर जुलैच्या शेवटच्या आठवडयात 27 रोजी जामनेर 83.5, चाळीसगाव 70.1 मि.मी., 9 ऑगस्ट रोजी धरणगांव 81.3,यावल78.4,चोपडा87,अमळनेर 71.3, तर 27 ऑगस्ट रोजी भुसावळ 72.2,यावल 89.2,बोदवड 70.7 मि.मी. अशी अतिवृष्टिची नोंद आहे. गत सप्टेबर महिन्यात पहिल्याच सप्ताहात वादळी वार्‍यांसह 200 ते 250 मि.मी पावसासह अतिवृष्टिचा इशारा हवामान खात्याने दिला होता. त्यानुसार 9 सप्टेबर दरम्यान एकाच दिवशी 411.4 मि.मी.पावसाची नोंद जिल्हा परीसरात सर्वच करण्यात आली होती.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!