एरंडोल येथे बालिकेचा आकस्मिकपणे मृत्यू

दुसरी बालिका अत्यावस्थ; जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरु

0
एरंडोल/जळगाव । एरंडोल येथील कागदीपुरा भागात राहणार्‍या दोन सख्या बहिणी असलेल्या बालिकांना विषबाधा झाला. यातील एका पाच वर्षीय बालिकेचा आकस्मिकपणे मृत्यू झाला असून 14 महिन्यांची बालिका अत्यावस्थ असून तिच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान या बालिकांनी पेप्सी व कुरकुरे खाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

जळगावाचे सासर असलेल्या अर्शिया इरफान शेख ह्या गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक कलहातून एरंडोल येथे माहेरी राहतात. त्यांच्या मोठी मुलगी खातीजा इरफान शेख (वय 5 वर्ष) तर लहान मुलगी शाहेरअंजुम इरफान शेख (दीड महिने) ह्या देखील त्यांच्या सोबतच राहतात. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून आर्शिया ह्या एरंडोलमधील छोट्याशा शाळेत शिकवायला जातात.

त्यामुळे त्यांच्या दोन्ही मुली त्यांच्या आईकडे राहतात. त्यांच्या आईचे घराच्या बाहेरील बाजूस छोटेसे किराणा दुकान असून त्यांनी पेप्सी विकण्यासाठी आणले होते. दुपारी खातीजा व शाहेरअंजूम या दोन्ही बालिकांनी पेप्सी व कुरकुरे खाले. त्यानंतर अचानक दोन्ही बालिकांना अत्यावस्थत वाटू लागले. त्यांना जवळच असलेल्या दवाखान्यात नेण्यात आले. याठिकाणी डॉक्टर नसल्याने त्यांना एरंडोलमधील खाजगी रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी दोन्ही बालिकांना तात्काळ जळगावी हलविण्याचा सल्ला दिला. दोन्ही बालिकांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता,

खातीजा या बालिकेला तपासणीअंती मयत घोषित करण्यात आले. तर शाहेरअंजूम शेख या बालिकेची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे. यावेळी कुटुंबियांनी खातिजा व शाहेरअंजूम या दोन्ही बालिकांनी पेप्सी व कुरकुरे खाल्ले असल्याचे सांगितले. दरम्यान खातीजाच्या शवविच्छेदन अहवालानंतर बालिकेच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.

LEAVE A REPLY

*