Type to search

जळगाव

सेवानिवृत्त सहाय्यक फौजदारावर प्राणघातक हल्ला करणार्‍या गुंडाला तात्काळ अटक करा

Share

जळगाव | फैजपुर येथील रहिवाशी असलेले सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार शेख शकील शेख दगु यांच्यावर दि.१८ रोजी प्राणघातक हल्ला राजकीय गुंड माजी नगरसेवक शेख जाफर शेख अजगर यांच्यासह पाच ते सहा जणांनी केला होता. या घटनेत प्राणघातक हल्ल्यासह दरोड्याचा गुन्हा दाखल असून पोलीस संशयितांना अटक करण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार शेख शकील दगु यांना जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेवून संशयितांना तात्काळ अटक न केल्यास आत्मदहन करण्याचा इशारा दिला.

सहाय्यक फौजदार म्हणून सेवानिवृत्त झालेले शेख शकील दगु हे दि.१८ रोजी दुपारी १ वाजता त्यांच्या मोटारसायकलीने घराकडे जात असतांना स्वप्नरुप हॉटेलजवळ राजकीय गुंड, माजी नगरसेवक शेख जफर शेख अजगर यांच्यासह त्याच्या नातेवाईकांनी मोटारसायकल अडवून शेख शकील दगु यांना शिवीगाळ करून बेदम मारहाण केली होती. तसेच त्यांच्या डोक्यात, तोंडात व नाकात पेट्रोल टाकून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या मारहाणीत शेख यांच्या खिश्यातील २० हजार रुपये हिस्कावून नेण्यात आले होते. दरम्यान याप्रकरणी फैजपूर पोलीसात प्राणघातक हल्ल्यासह दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर राजकीय गुंड शेख जफर शेख अजगर याने सपोनि वानखेडे यांच्याशी हातमिळवणी करून अर्थिक व्यवहार करीत शेख शकील दगु यांच्याविरुध्द खोटा गुन्हा दाखल केला. शेख शकील दगु यांना यांच्यावर केलेल्या प्राणघातक हल्ल्याचा एका युवकाने व्हिडीओ देखील तयार केला आहे. फैजपूर पोलीस स्टेशनचे सपोनि वानखेडे हे याप्रकरणी गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. प्राणघातक हल्ल्यासह दरोड्याच्या गुन्ह्यात मुख्य संशयित शेख जफर शेख अजगर यांच्यासह संशयितांना पोलीसांनी अद्याप अटक केली नसल्याने या संशयितांच्या अटकेसाठी सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार शेख शकील दगु यांच्यावतीने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात येवून संशयितांच्या अटकेसह, सपोनि वानखेडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!