Type to search

जळगाव

दुसर्‍या मजल्यावरुन पडल्याने कर्मचार्‍याचा मृत्यू

Share

जळगाव । शहरातील नेहरु नगरमध्ये राहणार्‍या प्रौढाचा दुसर्‍या मजल्यावरून पाय घसरून पडल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास घडली. अर्जुन काशीनाथ पानगळे वय 53 असे मयत प्रौढाचे नाव आहे.

याबाबत नातेवाईक व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अर्जुन काशीनाथ पानगळे हे जिल्हा परिषदेत शिक्षण विभागात वरिष्ठ लिपीक म्हणून कामाला होते. शनिवारी रात्री पाऊस पडला असल्याने रविवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास पानगळे हे दुसर्‍या मजल्यावर साचलेले पाणी बाजुला करीत असतांना अचानक त्यांचा पाय घसरून तोल गेल्याने ते खाली पडले. हा प्रकार कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांना तात्काळ उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान पानगळे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा पंकज व मुलगी असा परिवार आहे. याबाबत एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!