Type to search

जळगाव

कचर्‍यामुळे शहराचाच झालाय ‘कचरा’

Share

जळगाव । खड्ड्यांच्या समस्येबरोबरच शहरातील स्वच्छतेचा प्रश्नांचाही बोजवारा उडाला आहे. स्वच्छता ही केवळ नावालाच उरली असून स्वच्छतेचे ठेकेदार काम करीत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. कचरा पाच ते सात दिवस तसाच पडून राहतो. कचर्‍याची गाडी नियमित रोज येत नाही, आली तरी तिचा आवाज येत नाही, असेही नागरिकांकडून बोलले जाते. कचरा उचलणे क्रमप्राप्त असून मनपाने याबाबत तातडीची उपाययोजना करणे गरजेचे आहे.

शहर झाले कचरामय
शहरात रस्तोरस्ती, गल्लीबोळात कचर्‍याचे ढीग साचलेले दिसतात. गोलाणीकडून काँग्रेसभवनाकडे जाणार्‍या रस्त्यावर कचर्‍याचा ढीग साचून राहतो, तसेच होमगार्ड ऑफीसजवळ व गायत्री मंदिरामागील गल्लीबोळातील कचरा तसेच टेलिफोन ऑफिसजवळील रस्त्यांवरील चौक तसेच तुकाराम वाडीतील भुईकाटा समोरील कचर्‍याचा ढीग तसेच डॉ. फिरके दवाखानामागील गल्लीबोळातील कचरा तसेच गोलाणी मार्केट मागील बोळातील कचरा यासह शहराच्या अनेक मध्यवर्ती ठिकाणी कचर्‍याचे ढीग पडून आहेत. यामुळे शहरात दुर्गंधी पसरत आहे.

कचर्‍यामुळे मिळते आजारास निमंत्रण
शहरातील विविध भागात कचरा साचून आहे. रस्तोरस्तीही कचरा दिसतो. मात्र या कचर्‍याकडे साफ दुर्लक्ष केले जाते. मनपातर्फे पाच ते सात दिवस कचरा पडून राहतो. कचरा उचलायला कुणी येत नाही, आरोग्याचा प्रश्नही कठीण होवू लागला आहे. यामुळे विविध साथीच्या आजारांना आयते आमंत्रण मिळू शकते.
– सीताराम चौधरी, एक रहिवाशी.

कचर्‍याचा प्रश्न ताबडतोब मार्गी लावू

कचर्‍याचा प्रश्न हा खरोखरच गंभीर प्रश्न आहे. यामुळे जनसामान्य नागरिकांना त्रास होवू नये, यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी ऑगस्टमध्ये मोठ्या एकमुस्त ठेक्याचेही काम मार्गी लागणार आहे. त्यासाठी प्रोसीजर ही आता अंतिम टप्प्यात आहे. तोपर्यंत जुने ठेकेदारांकडून हे काम सुरूच राहील.
– उदय पाटील,आरोग्याधिकारी, मनपा

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!