Type to search

जळगाव

मनपा तीजोरीवर दरमहा 4 कोटी रुपयांचा अधिक भार

Share

जळगाव । तत्कालिन नगरपालिकेने कर्मचार्‍यांना दिलेल्या उड्डाण पदोन्नत्यांमुळे चतुर्थ श्रेणी कर्मचारी अचानक अधिकारी झाले असून त्यांच्या वेतनात तीन ते चार पट वाढ झाली आहे. त्यामुळे 20 हजार रूपयांपर्यंत वेतन असलेला कर्मचारी चक्क 70 ते 1 लाख 10 हजार रुपये वेतन घेऊ लागला आहे. यामुळे मनपाच्या तीजोरीवर दरमहा 4 कोटी रुपयांचा अधिक भार पडत असल्याचे बोलले जात आहे.

तत्कालिन नगरपालिकेने 66 कर्मचार्‍यांना अवघ्या दोन दिवसात उड्डाण पदोन्नत्या देऊन अधिकारी पदावर नियुक्त्या दिल्या आहेत. तसेच 177 चतुर्थ श्रेणी कर्मचारी दोन दिवसात वरिष्ठ लिपिक झाले असल्याची बाब समोर आली असून याबाबत कर्मचारी संघटनेचे अजय घेंगट, अनिल नाटेकर यांनी भ्रष्टाचार निर्मूलन समितीत तक्रार केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने सदर कर्मचार्‍यांना पदावनत करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी मनपा आयुक्तांना दिले आहेत.

मनपातील जवळपास 200 कर्मचार्‍यांची उड्डाण पदोन्नत्यामध्ये विविध पदावर वर्णी लागलेली आहे. या कर्मचार्‍यांचे मुळ पदावरील वेतन 18 ते 20 हजार दरमहा वेतन होते. परंतु त्यांना मिळालेल्या उड्डाण पदोन्नत्यांमध्ये त्यांची वर्णी वरिष्ठ लिपिक विभाग प्रमुख, अधिकारी पदी लागली असून सदर कर्मचार्‍यांना 20 हजारावरुन 70 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत वेतन मिळू लागले आहे. यामुळे महानगरपालिकेचा दरमहा 3 कोटी रुपये होणारा खर्च 7 कोटी रुपयांवर गेला असून दरमहा मनपाच्या तीजोरीवर 4 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडू लागला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!