Type to search

जळगाव

हिंमत असेल मतपत्रिकेवर निवडणूक घ्या!

Share

जळगाव । आपल्याला नेहमीच बहुमताने निवडून येण्याचा गर्व असेल तर बॅलेट पेपरवर एकदा निवडणूक लढवून दाखवाच, पुन्हा एकदा निवडून आलो नाही तर भास्कररावांचा मुलगा हे नाव सांगणार नाही असे खुले आव्हान आज आमदार डॉ. सतीश पाटील यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांना जिल्हा नियोजन बैठकीत दिले.या प्रकरणावरून बराचवेळ कलगीतुरा रंगला

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार डॉ. सतीश पाटील यांनी बोलतांना सांगितले की अनेक प्रश्न अनुत्तरीत असून ते सोडविणे गरजेचे आहे.तुमच्याकडे अजून दीड महिना आहे, याकाळात या समस्या मार्गी लागाव्यात अशी सर्वांचीच अपेक्षा आहे. यावर कोटी करीत ही तुमच्यासाठी शेवटची बैठक आहे, असे ना.गिरीश महाजन यांनी म्हणताच आ.डॉ. पाटील यांनी आक्रमक होत मंत्र्यांना प्रतिउत्तर देत दीड महिन्यानंतर आचार संहिता लागू होत आहे. ‘तुम्हाला नेहमीच बहुमताने निवडून येतो हा गर्व असेल तर बॅलेट पेपरने एकदा निवडणूक जिंकून दाखवा,मी देखील अशीच निवडणूक लढवून जिंकून दाखवतो,निवडून नाही आलो तर नाव सांगणार नाही असे खुले आव्हान ना.महाजन यांना दिले.

पुढे बोलतांना पाटील म्हणाले की नियोजन बैठकीत अनेक समस्यांचे निराकरण होते. मात्र आलेला पैसा नियोजनाअभावी खर्च करता आला नाही.त्यामुळे सर्व पैसे पुन्हा शासनाकडे जमा झाले आहेत.. यापूर्वी स्व. पांडुरंग फुंडकर व चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री म्हणून जिल्ह्याच्या विकासाची कामे न करता एखाद्या लग्नाला किंवा पर्यटनाला आल्याचे दाखवून अर्ध्या तासात नियोजनाच्या बैठका आटोपल्या होत्या. त्यावेळी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ठोस निर्णय घेतला नाही. या अनियमिततेमुळे दोन वर्षांपासून जळगाव जिल्हा दुष्काळाने होरपळतोय. कोणतेही कामे करतांना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले जात नाही. आपण गिरणेवर सात बलून बंधारे बांधण्यासाठी मोठा गाजावाजा केला होता. याचा प्रश्न या बैठकीत केला होता. या कामांची सद्य:स्थिती काय आहे, सत्ताधार्‍यांनी पाच वर्षे खोटे बोलण्यात घालविले.

आज शेतकरी अडचणीत आहे. शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. संकटमोचक ना. गिरीश महाजन यांनी आज आमदारांना सोबत घेवून जिल्ह्याचा काय विकास करायचा आहे तो करावा, असे सांगत डॉ. पाटील यांनी आपल्या आव्हानाचा पुनरूच्चार केला. ते म्हणाले की, मतपत्रिकेद्वारे मतदान झाल्यास मी निवडून आलो नाही तर नाव सांगणार नाही,असा सवाल उपस्थित केल्याने सभास्थळी राजकीय जुगलबंदीची चर्चा रंगू लागली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!