Type to search

जळगाव

कागदावरचे आकडे तृप्त असल्यानेच जिल्हा कोरडाठाक!

Share

जळगाव । जिल्ह्यात मनरेगांतर्गत समतल चरातून वाहून जाणारे पाणी छोट्या छोट्या बंधार्‍यांमध्ये अडविण्यासाठी अनेक प्रकारचे बंधारे उभारण्यात आले. कुठे दगड एकावर एक रचून गॅबियन पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला. जलयुक्त शिवार अंतर्गत जमिनीत पाणी अडून राहील, असे वेगवेगळ्या प्रकारची कामे ग्रामीण भागात पूर्ण झाली तर मनरेगांतर्गत जिल्हयातील ग्रामपंचायती अंतर्गत 975 कामे सुरु असल्याचा सरकारी यंत्रणेचा दावा आहे. मात्र, कागदावरचे हे सगळे आकडे सध्या तहानलेल्या अवस्थेत आहेत. पर्यायाने जिल्हा अजूनही कोरडाच आहे.

पावसाचा खंड अधिक असल्यामुळे संरक्षित सिंचन व्हावे, यासाठी जिल्ह्यातील 4 थ्या टप्प्यात 15 तालुक्यातील 1100 गावांपैकी 235 गावांमध्ये दिलेले उद्दीष्टांकपूर्ती झाली आहे. जवळपास 70 ते 80 टक्क्यांपेक्षा कमी काम झालेल्या गावांची संख्या अत्यंत कमी आहे. एवढे सगळे काम पूर्ण झाल्यानंतरही पाऊस नसल्यामुळे जिल्ह्यात चिंताजनक स्थिती आहे. जिल्हयात जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे यासह अनेक कामे कृषी विभागांतर्गत 2015 पासून जलयुक्तच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आली. तिन्ही टप्प्यात निवडण्यात आलेल्या सर्वच ठिकाणी दिलेले उद्दीष्ट पूर्ण झाले आहे. दरवर्षी 70 ते 80 कोटी रुपये जलयुक्त शिवार योजनेवर खर्च झालेले आहे

गिरणा धरणाने आतापर्यंत तारले
गेल्या तीन चार वर्षांपासून पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. सप्टेंबर 2017 अखेर झालेल्या पावसाने गिरणा प्रकल्पात 65.80 टक्के जलसाठा होता, तर 2018 मध्ये पावसाचे प्रमाणच जेमतेम 42 टक्के असल्याने अपेक्षित साठा झाला नसल्याने गत काळात असलेल्या प्रकल्पातील जलसाठ्याने जिल्ह्याला आतापर्यंत तारले आहे. आजमितीस गिरणा धरणात केवळ 7 टक्के उपयुक्त जलसाठा आहे, तो देखील निम्मेच्यावर गाळयुक्तच आहे. त्यामुळे या प्रकल्पात गाळमुक्त धरण योजनेव्दारे गाळ काढणे गरजेचे होते.

जलयुक्त कामांमधून संरक्षित सिंचन
‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेत जिल्ह्यात सर्वाधिक कामे मंजूर झाली असली तरी मार्च ते मे दरम्यान यावर्षी आचारसंहिता असल्यामुळे कामे कमी प्रमाणात झाली. जर पाऊस झाला तर जलयुक्तच्या कामामुळे 235 गावांत झालेल्या हजारो हेक्टरक्षेत्राला संरक्षित सिंचन मिळणार आहे. पावसाचा खंड वाढला तर जलयुक्त शिवार योजनेच्या संरक्षित सिंचनामधून विविध कामांव्दारे पाणी उपलब्ध होऊ शकेल.
– डॉ.संभाजी ठाकूर, जिल्हा कृषी अधिकारी

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!