Type to search

Breaking News जळगाव मुख्य बातम्या राजकीय

शिवसेनेचा टक्का वाढविण्यासाठी जिल्ह्यात ‘आदित्य’ मैदानात

Share

जळगाव । आगामी दोन महिन्यांनी होणार्‍या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून साखरपेरणी करीत शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जनआशीर्वाद यात्रा काढण्याचा श्रीगणेशा जळगावातील नवीपेठ येथील इच्छापूर्ती गणेशाचे दर्शन गुरुवारी घेवून केला.

जळगाव जिल्ह्यात शिवसेनेच्या विधानसभा निवडणुकीत भरघोष मतांनी उमेदवार विषयी होवून निवडून यावे, यासाठी जनआशीर्वाद यात्रा युवासेना प्रमुख यांनी गुरुवारी जळगावातील इच्छापूर्ती गणपती मंदिरात आरती करुन श्रीगणेशा केला. त्यानंतर त्यांनी पाचोरा येथील मतदार संघातील नियोजीत कार्यक्रमासाठी रवाना झाले. जळगावात अवघे दहा मिनीटाचा त्यांचा दौरा होता. यावेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री रामदास कदम, खासदार संजय राऊत, संपर्क प्रमुख संजय सावंत, युवासेना विस्तारक कुणाल दराडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या हस्ते आरती

युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे गुरुवार दि.18 रोजी सकाळी 11.50 वाजता जळगाव शहरातील नवीपेठ भागातील इच्छापूर्ती गणेश मंदिरात आगमन झाले. गाडीतून उतरल्यानंतर त्यांनी मंदिरात प्रमुख कार्यकर्त्यांसोबत प्रवेश केला. गणपतीची आरती झाल्यानंतर 12 वाजता गाडीत बसून पाचोर्‍याकडे रवाना झाले. अवघे दहा मिनीट इच्छापूर्ती गणेश मंदिरात आदित्य ठाकरेंनी हजेरी लावली. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

युवासेना प्रमुखांसोबत शिवसैनिकांचे फोटोसेशन
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते इच्छापूर्ती गणपती मंदिरात आरती झाल्यानंतर प्रमुख शिवसैनिकांपैकी काहींनी युवा सेनाप्रमुखांसोबत फोटोसेशन करुन घेतले. यावेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, युवा सेना विस्तारक कृणाल दराडे, माजी नगरसेवक शाम कोगटा, साधनाताई कोगटा, नगरसेवक नितीन बरडे, शहर प्रमुख शरद तायडे, मनोज चौधरी, किशोर भोसले, मंगला बारी, राहुल नेतलेकर, शोभा चौधरी, गणेश गायकवाड, जितेंद्र गवळी, सोहम विसपुते, मानसिंग सोनवणे, प्रकाश बेदमुथा, श्रीकांत आगळे, जाकीर पठाण, पुजारी प्रमोद जोशी, बारपांडे महाराज यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. आदित्य ठाकरे यांच्या दिमतीला 18 गाड्यांचा ताफा होता. मंदिराबाहेर सुरक्षासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता. युवा सेनाप्रमुखांना पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होती.

आदित्य ठाकरेंना महापौरांकडून बहिणाबाई चौधरी यांचे पुस्तक भेट
युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे इच्छापूर्ती गणपती मंदिरात आगमन होणार असल्याने शिवसेना व युवासेनेच्या प्रमुख पदाधिकार्‍यांसह कार्यकर्ते मंदिर परिसरात उपस्थित होते. तसेच महापौर सीमा भोळे हे सुद्धा अर्धातास अगोदर युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या भेटीसाठी गुरुवारी गणपती मंदिरात दाखल झाल्या होत्या. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आरती झाल्यानंतर महापौर सीमा भोळे यांचा परिचय नगरसेवक नितीन बरडे यांनी करुन दिला. त्यानंतर महापौर सीमा भोळे यांनी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना निसर्ग कन्या बहिणाबाई चौधरी यांचे पुस्तक भेट दिले. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक नितीन बरडे, शामभाऊ कोगटा, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील,शरद तायडे, किशोर भोसले यांच्यासह युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!