Type to search

जळगाव

बी.यू.एन.रायसोनी शाळेत गुरूपौर्णिमा साजरी

Share

जळगाव – ‘गुरू म्हणजे माय-बाप, नाम घेता हरतील पाप’ या कृतार्थ भावनेने मातांचा सन्मान व गुरूवंदना करून येथील बी.यू.एन.रायसोनी मराठी शाळेत गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

सकाळ सत्रातील शिशुविहार विभागाने गुरू-शिष्याची जोडी म्हणून आई व मुलगा यांना बोलवून त्यांचा सन्मान केला. यात विठ्ठल-जनाबाई, कृष्ण-यशोदा, नर्स-डॉक्टर, शिक्षक-विद्यार्थी, गणपती-पार्वती, कार्तिक, सासू-सुन, शाम-शामची आई आदी रूपात आई व मुलाचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रंजना चौधरी या होत्या. त्यांच्याहस्ते सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली.

 

यावेळी शाळेचे अध्यक्ष शिरीष रायसोनी, उपाध्यक्ष उमेद रायसोनी, मुख्याध्यापक चंद्रशेखर पाटील, मुख्याध्यापिका सौ.रेखा कोळंबे व शिक्षक वृंदांसह पालक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!