Type to search

जळगाव

पारोळा तालुक्यात बिबट्या पडला विहिरीत!

Share

जळगाव / पारोळा। पारोळा वनपरीक्षेत्रातील मोंढाळे येथून जवळच सोके शिवारात एका विहिरीत बिबट पडला होता. त्यास वनविभाग कर्मचारी, अधिकारी व ग्रामस्थांच्या मदतीने सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. वैद्यकिय उपचारानंतर त्यास योग्यवेळी जंगलात सोडण्यात येईल, अशी माहिती उपवनसंरक्षक दिगंबर पगार यांनी दिली आहे.

पारोळा तालुक्यातील सोके शिवारात झाडाझुडपात बिबट्याचे दर्शन परिसरातील शेतकर्‍यांना झाले. घाबरुन शेतकरीगोंगाट करु लागल्याने बिबट्या तेथुन पळ काढत सैरावैरा धावु लागला. परंतु याच परिसरातील अरुण दयाराम पाटील यांचा शेतातील बिबट्या पळताना पुंजू पोपट पाटील यांच्या विहिरीत पडला. विहिरीत बिबट आढळले असल्याची माहीती मुंदाणे येथील बबलु पाटील यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी आर एस दसरे यांना दिली. पोलीस आशिष चौधरी, ईश्वर शिंदे व वन कर्मचार्‍यांचे पथक घटनास्थळी आले.

त्यानुसार उपवनसंरक्षक दिगंबर पगार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक केशव फंड यांचे देखरेखीखाली विहिरीत पडलेल्या बिबट्याला पारोळा वनपरीक्षेत्र अधिकारी आर.एस.दसरे, फिरत्या पथकातील राजेंद्र राणे, वनपाल एम.बी.बोरसे,वनरक्षक व्हि.एच.शिसोदे, पी.पी.पाटील, सोके सरपंच अमोल पाटील, पोलिस पाटील देवाजी पाटील अन्य ग्रामस्थांची मदत घेण्यात आली. विहिरीत क्रेनच्या सहाय्याने पिंजरा सोडून बिबट्यास सुरक्षितरित्या काढण्यात आले. हे बिबट सुमारे 4 वर्षाचे असून नर जातीचे आहे. त्याच्यावर पारोळा पशुवैद्यकिय अधिकारी डॉ.ए.डी.पाटील, एम.जे.तळकर,एम.एन.गाडीलकर यांचेकडे तपासणी करून औषधोपचार करण्यात आले.

सुदैवाने जिवितहानी टळली
परिसरात बिबट्या दिसताच शेतकर्‍यांनी आरडाओरड केली. परंतु बिबटा एकदमच घाबरुन गेल्याने तो शेतकर्र्‍याकडे धाव न घेता शेतांकडे सैरावैरा पळु लागला. अचानक त्याचा तोल विहीरीत गेल्याने सापडला. त्याची धाव गावाकडे राहीली असती तर निश्चितच जिवीतहानी झाली असल्याचे ग्रामस्थ बोलत होते. यावेळी उपसरपंच अमोल पाटील, राजेंद्र बोरसे, दीपक पाटील, सूर्यकांत मराठे, संजय पाटील, योगेश रोकडे (करंजी) यासह आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!