Type to search

जळगाव

ठेवी परत मिळण्यासाठी जिल्हा उपनिबंधकांना कार्यालयात घेराव

Share

जळगाव । जिल्हयातील पाचोरा पीपल्स बँकेच्या तत्कालीन चेअरमन, संचालकांनी केलेल्या गैरव्यवहारप्रकारणी फौजदारी कारवाईसह गेल्या कित्येक वर्षापासून ठेवीदारांच्या अनेक पतसंस्थामधील ठेवी परत मिळण्यासाठी शासनाकडून 200 कोटीचे विशेष अर्थसहाय्य प्रस्ताव मंजूर करण्यात यावा, या मागणीसाठी सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर जनसंग्राम बहुजन लोकमंचतर्फे विवेक ठाकरे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करून जिल्हा उपनिबंधकांना घेराव घालण्यात आला.

यावेळी पीपल्स बँकेचे विकास वाघ,अविनाश भालेराव, अनिल पाटील, सुनिल मोर, अनुराधा बिल्दीकर, नारायण मोर, यशवंत गाजरे, प्रभाकर पाटील, मधुकर भिरुड, भागवत रडे, देवीदास फिरके, नीलिमा पाटील, मालती सोनार, निशा चौधरी, नीता भिरुड, रजनी पाटील, वसंत गाजरे, निशा चौधरी, भास्कर चौधरी आदी उपस्थित होते. सन 2014-15 पूर्वी विद्यमान सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील विरोधी पक्षात होते त्यावेळी ठेवीदारांच्या प्रश्नावर पोडतिडीकेने बोलत होते. मात्र, आता ठेवी मिळवून देण्यासंदर्भात दुर्लक्ष होत आहे. अवसायक व प्रशासक नेमलेल्या पतसंस्थांत गैरप्रकार वा ठेवीदारांच्या प्रश्नी उपनिबंधक प्रशासनाची उदासीनता दिसत आहे. दरम्यान, ठेवीदारांचा परतावा देण्यासाठी 200 कोटीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे ठेवला आहे. या संदर्भात सहकार राज्यमंत्री व संबंधित वरिष्ठांशी पाठपुरावा करण्यात येईल, असे जिल्हा उपनिबंधक एम.यु.राठोड यांनी आंदोलनकर्त्यांना आश्वासन दिले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!