Type to search

जळगाव

तक्रारदार विद्यार्थी, विद्यार्थिनी रविवारी चौकशी समितीसमोर मांडणार भूमिका

Share

जळगाव । बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वृत्तपत्र व जनसंवाद विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर भटकर यांच्या विरुद्ध झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती नेमली आहे. ही समिती तक्रारदार विद्यार्थी विद्यार्थीनी रविवार 14 जुलै रोजी बोलवले आहे. दोघा विद्यार्थीनींसह त्या विद्यार्थ्याला रविवारी विद्यापीठात चौकशीला हजर राहण्याचे पत्र देण्यात आले आहे.

विद्यापीठातील पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर भटकर यांच्या एकतर्फी प्रेम प्रकरणासंदर्भात तक्रार पत्रकारीतेच्या एका विद्यार्थ्याने केली होती. या प्रेम प्रकरणामुळे गुणांमध्ये हेरफेर झाल्याचे त्या विद्यार्थ्याने तक्रारीत म्हटले होते. त्या विद्यार्थ्याने केलेल्या तक्रारीचे वृत्त ‘देशदूत’मध्ये प्रसिद्ध होताच विद्यापीठ प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. या प्रकाराच्या चौकशी करण्यासाठी चौकशी समितीची स्थापना केले.

समितीत तीन महिला व तीन पुरुष प्रतिनिधींचा समावेश आहे. चौकशी समितीत बाहेरील विद्यापीठातील प्रतिनिधींचा देखील समावेश असल्यामुळे या प्रतिनिधींना येण्या-जाण्यासाठी वेळ मिळावा यासाठी रविवारपासून समितीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. दरम्यान याबाबतच अधिक जाणून घेण्यासाठी भटकर यांचेशी संपर्क साधला असता भटकर यांनी फोन रिसीव्ह करुन कोण बोलत आहे हे ऐकल्यानंतर ऐकू येत नसल्याचे कारण देत फोन कट केला. त्यानंतरही दोन तीन वेळा त्यांचेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन घेतला नाही.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!