Type to search

जळगाव

जिल्हा परिषद बंद छापखाना पुनर्जीवित करणार

Share

जळगाव । गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेचा छापखाना बंद अवस्थेत पडलेला आहे. त्याला पुनर्जीवित करण्यासाठी छापखाना पुनर्गठन समिती स्थापन करण्यात आली असून, समिती अध्यक्ष तथा जि.प.सदस्य जयपाल बोदडे यांच्या नेतृत्वाखाली सांगली सातारा दौरा करण्यात आला. गेल्या अनेक सभांमधून जि.प.सदस्य बोदडे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्यांनी छापखाना पुनर्जीवित करण्यासाठी शिवधनुष्य उचलले आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर यांनी जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या दालनाच्या आवारात सदस्यांसमोर बंद छापखाना तीन वर्षातही सुरु होणार नसल्याचा दावा केला आहे.

मात्र भाजपचे जि.प.सदस्य जयपाल बोदडे हे देखील बंद असलेला छापखाना सुरु करण्यासाठी दंड थोपटून मैदानात उतरले आहेत. पूर्वी ज्यांनी हा कारखाना बंद केला. त्यानंतर अनेकांनी समित्या गठीत झाल्या. मात्र निस्वार्थ भावनेअभावी आणि टक्केवारीची किनार असल्याने सदस्य आणि अधिकार्‍यांच्या मिलीभगतमुळे बंद छापखाना सुरु होण्यास अडचणींचा डोंगर पावलो-पावलावर उभार राहिला. या समितीमध्ये सर्व सदस्य सामूहिक भावनेने एकत्रित आलेले असून जिल्हा परिषदेचे हित डोळ्यासमोर ठेवून अधिकार्‍यांनाही सोबत घेवून काम करण्यास तयार असल्याने छापखान्याची वाट सुकर होण्याचा आशावाद निर्माण केला आहे.

निस्वार्थ भावनेने जिल्हा परिषदेचा बंद असलेला छापखाना उभारणीसाठी कसोशीने प्रयत्न सुरु केले आहे. या प्रयत्नाला यश येईल आणि बंद असलेला छापखाना सुरळीत होवून जि.प.चा छपाई खर्च वाचणार आहे.
– जयपाल बोदडे,
जि.प.सदस्य

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!