Type to search

जळगाव

जुलैतदेखील 158 टँकरद्वारे पाणीपुरवठा

Share

जळगाव । या वर्षी उशिराने जूनच्या शेवटच्या आठवडयात दाखल झालेल्या पावसाने जिल्हा परिसरात धूळपेरणी करण्यात आलेल्या पिकांना तारले असले तरी जिल्हयातील हतनूर वगळता गिरणा व वाघूर जलसाठा पाणलोट क्षेत्रात अजूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने जिल्हा परिसरात जुलैच्या दुसर्‍या आठवडयात देखील 184 गावांसाठी 158 टँकरव्दारे टंचाई निवारणासाठी पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती टंचाई निवारण विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.

यावषीर्र् पावसाळयातील 120 दिवसांपैकी 40 दिवसांचा कालावधी उलटूनदेखील जून महिन्यातील सरासरीपेक्षा अत्यंत कमी पर्जन्यमानामुळे जिल्हयातील तलाव, धरणे, जलसाठे यांच्यावर देखील परिणाम झाला आहे. जिल्हयातील तीन मोठया प्रकल्पापैकी गिरणा प्रकल्पात सरासरी 7.13 , वाघूर 13.45 टक्के जलसाठा सद्यःस्थितीत आहे. तर बहुतांश लघु मध्यम प्रकल्पात शून्य साठा अशी गंभीर परिस्थिती आहे.

306 विहीर अधिग्रहण
ग्रामीण भागात पाणीटंचाई निवारणार्थ खासगी तसेच शासकीय टँकरद्वारा पाणी पुरवठ्यासह विहिरींचे अधिग्रहण देखील करण्यात आले आहे. यात जळगाव 4, जामनेर तालुक्यात 24, धरणगाव 43, एरंडोल 29, भुसावळ 22, यावल 5, रावेर 2, मुक्ताईनगर 32, बोदवड 19, पाचोरा 30, चाळीसगाव 26, भडगाव 5, अमळनेर 41, पारोळा 16 तर चोपडा तालुक्यात 8 विहिरी असे एकूण 298 गावातील 306 विहिरींचे अधिग्रहण तर 56 गावात 53 तात्पुरता पाणीपुरवठा तसेच 106 गावांसाठी 191 नवीन विंधन विहिरींना मान्यता देण्यात आली आहे.

लागवड झालेल्या पिकांवरदेखील परिणाम
जिल्हा परिसरात उशिराने दाखल झालेल्या मान्सूनमुळे काही ठिकाणी धूळपेरणी केलेल्या पिकांना काहीसे जीवदान मिळाले असले तरी पेरणीस विलंब झाल्याने ज्वारी, कापूस वाणाच्या बियाणे लागवडीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे उत्पादनात घट येणार आहे. तर कृषि विभागातर्फे शेतकर्‍यांनी अल्पवधित येणार्‍या पिकाचे नियोजन कसे करावे, याचे कोणतेही मार्गदर्शन कृषि विभागाकडून झालेले नसल्याने बहुतांश शेतकर्‍यांनी बाजरी, मका या वाणांसह सोयाबीन वाणाची लागवड ग्रामीण भागात केलेली दिसून येत आहे. तर काही ठिकाणी पेरणी झालेल्या क्षेत्रात कोळपणी, निंदणी आदी कामात शेतकरी व्यस्त झाला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!