Type to search

जळगाव

पंढरपूरच्या वारकर्‍यांची विशेष रेल्वे रवाना

Share

भुसावळ । आषाढी एकादशी निमित्त माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली, खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नांनी पंढरपूरला जाण्यासाठी वारकरी व भाविकांसाठीची विशेष रेल्वेचे दि. 11 रोजी सकाळी 9.15 वाजता येथील रेल्वे स्थानकावरुन रवाना करण्यात आली,

या विशेष गाडीला खा.रक्षा खडसे, आमदार चैनसुख संचेती, आमदार संजय सावकारे यांनी हिरवा झेंडी दाखवली.या वेळी जेडीसीसी बँक अध्यक्षा अ‍ॅड. रोहिणी खडसे-खेवलकर, जिप उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा.डॉ.सुनील नेवे, नगराध्यक्ष रमण भोळे, पं.स.समिती सभापती प्रीती पाटील, बोदवड पं.स. सभापती गणेश पाटील, रावेर पं.स. सभापती माधुरी नेमाडे, सावदा नगराध्यक्ष अनिता येवले, फैजपूर नगराध्यक्ष महानंदा होले, मुक्ताईनगर नगराध्यक्ष नजमा तडवी, उदयोगपती मनोज बियाणी, भाजपा तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष दशरथ कंडेलकर, भुसावळ शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे, जि.प. सदस्या पल्लवी सावकारे, जि.प. सदस्य सविता भालेराव, भुसावळ पंस उपसभापती वंदना उन्हाळे,पंस सदस्य मनीषा पाटील, अनिकेत पाटील, गोलू पाटील, सुमित बर्‍हाटे, एडीआरएम मनोज सिंन्हा, वरीष्ठ वाणिज्य विभागीय प्रबंधक आर. के. शर्मा, मंडल वाणिज्य प्रबंधक बी. अरुणकुमार, सहायक वाणिज्य प्रबंधक अजयकुमार, स्टेशन डायरेक्टर जी.पी.अय्यर, वाणिज्य निरीक्षक जीवन चौधरी, प्रितम राणे, पराग भोळे उपस्थित होते.

जिल्ह्यातील भाविक आणि वारकरी आषाढी एकादशीनिमित्त मोठ्या प्रमाणावर विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जातात. त्यांच्या सोयीसाठी ही विशेष गाडी रवाना करण्यात आली.ही गाडी पंढरपूर येथे रात्री 10.10 वाजता पोहोचेल. 12 जुलै रोजी रात्री 9:50 वाजता ही गाडी पंढरपूर येथून सुटेल व 13 जुलै रोजी दुपारी 2:40 वाजता भुसावळ येथे पोहचेल.या गाडीत भाविक मोठ्या संख्येने रवाना झाले.

वारकर्‍यांसाठी 11 बसेस- दरम्यान पंढरपूर जाणार्‍या वारकर्‍यांसाठी येथील आगाराने आतापर्यंत 11 बसेस सोडण्यात आल्या होत्या. त्यापैकी 3 बसेस दि. 11 रोजी रवाना करण्यात आल्या या गाड्यांचा खेड्यापाड्यांतील प्रवाशांना लाभ झाला. परतीसाठी दि. 12 रोजी तीन गाड्या पंढरपूर येथून सुटणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!