Type to search

जळगाव

विद्युत खांबाला स्पर्श झाल्याने तीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

Share

जळगाव । शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात विद्युत खांबाला स्पर्श झाल्याने शॉक लागून तीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली. चिमुकल्याच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात आक्रोश केला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली होती. गुरु संतोष माळी (वय 3) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.

याबाबत परिसरातील नागरिकांकडून मिळालेली माहिती अशी की, पिंप्राळा हुडको परिसरात गुरु संतोष माळी हा चिमुकला घराबाहेर खेळत होता. अचानक खेळताखेळता त्याचा विद्युत खांबाला स्पर्श झाला. खांबामध्ये विद्युत प्रवाह उतरला असल्याने गुरू दूरवर फेकला गेला. त्याचे आई-वडील, आजीने त्याला तत्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.

याठिकाणी तपासणीअंती डॉ. प्रवीण पाटील यांनी या चिमुकल्याला मृत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी जिल्हा रुणालयात आक्रोश केला. त्यानंतर सायंकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. याबाबत रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत गुरूला एक मोठा भाऊ, व लहान बहीण आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!