Type to search

जळगाव

महापालिकेचे खाते सील? मनपाला नोटीस

Share

जळगाव । महानगरपालिकेचे खाते गोठविण्याबाबत महानगरपालिकेस नुकतीच नोटीस प्राप्त झाली आहे. मात्र, ही केवळ नोटीस आहे, खाते सील झाले नाही; अशी माहिती आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांनी दिली.

खाते सीलची चर्चा
स्थायी समितीची सभा आटोपल्यानंतर मनपाचे खाते सील झाल्याबाबतच्या चर्चेला उधाण आले होते. एकच चर्चा मनपाच्या गोटात होत होती. याबाबत आयुक्तांकडून माहिती घेतली असता आयुक्तांनी केवळ नोटीस आली आहे; यावर आम्ही वकिलांशी चर्चा करीत आहोत, अशी माहिती पत्रकारांना दिली.

मात्र सत्य वेगळेच
आयुक्तांकडून या माहितीबाबत टाळाटाळ केली जात असल्याचे समजते. मात्र, सत्य वेगळेच असल्याचेही काही विश्वसनीय सूत्रांकडून बोलले जात होते. महानगरपालिकेचे खाते खरंच सील करण्यात आल्याची नोटीस मनपास आली असल्याची माहिती असल्याचे समजते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!