Type to search

जळगाव

आठ दिवसांपासून मोटारसायकल बेवारस स्थितीत पडून

Share

जळगाव । शहरातील आदर्श नगरात पुष्कराज अपार्टमेंट जवळील पाणपोईजवळ गेल्या 10 दिवसांपासून एमएच 19 एएल 6003 क्रमांकाची मोपेड गाडी बेवारसस्थितीमध्ये उभी आहे. याबाबत मागील चार दिवसांपूर्वी माजी नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी रामानंद नगर पोलिसात तक्रार दिल्यानंतरही पोलिसांनी कुठलीही कारवाई केलेली नाही.

मागील आठ दिवसांपासून पुष्काराज अपार्टमेंटच्या बाहेर ही मोपेड गाडी उभी आहे. दरम्यान या मोपेड गाडीच्या डिक्कीत संशयास्पद वस्तू असण्याची शक्यता असल्याने माजी नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी याबाबत पोलिसात तक्रार केली होती. चार दिवस उलटून देखील पोलिसांनी याबाबत कुठलीही दखल घेतलेली नाही. ही मोपेड गाडी नेमकी कोणाची आहे? याबाबत संपूर्ण परिसरात विचारणा झालेली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!