Type to search

जळगाव

एस.टी कर्मचारी पतपेढी बैठकीत नोकर भरतीच्या विषयावरून गोंधळ

Share

जळगाव । जळगाव जिल्हा एस.टी कर्मचारी सहकारी पतपेढीच्या 58 व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत नंदुरबार शाखेतील नोकर भरतीच्या विषयावरून चांगलाच गोंधळ झाला. चेअरमन यांनी नोकर भरतीचा विषय मांडल्याने बैठकीत सभासदांनी हा विषय नामंजूर असल्याचे सांगितले.

एस.टी कर्मचारी सहकारी पतपेढीची बैठक मानद अध्यक्ष विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आली. यावेळी व्यासपीठावर चेअरमन पंडीत बाविस्कर, इंटकचे सुरेश चांगरे, तसेच आर.के.पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते. सभासदांनी नोकरी भरतीत गैरव्यवहार झाला असल्याचे सांगून हा विषया नामंजूर करण्यात यावा अशी मागणी केली.

बैठकीत कर्मचार्‍याला हृदयविकाराचा झटका
एस.टी कर्मचारी सहकारी पतपेढीच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत गोंधळ सुरु होता. याचवेळी अचानक इंटक संघटनेचे सचिव नरेंद्रसिंग राजपूत यांना व्यासपीठावरच हृदयविकाराचा झटका आला. कर्मचार्‍यांनी त्यांना तात्काळ उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल केले. या प्रकारामुळे बैठकीत पुन्हा गोंधळ निर्माण झाल्याने सभा आटोपटी घेण्यात आली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!