Type to search

जळगाव

बहुजनांचे संघटन असणे गरजेचे – प्रा.धुमाळे

Share

जळगाव । देशात राज्यघटनेनुसार शोषित दुर्लक्षित घटक आहेत. त्यांना अधिकार अस्तित्वात आहेत, ज्यांना हे अधिकार कळतात, ते संविधान वाचविण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतात. परंतु, कोण कोणामुळे असुरक्षित आहे, त्यांना दुय्यम दर्जाचे स्थान दिले जाते. अशा वेळी बहुजन संघटीत असणे गरजेचे आहे. या संबंधांचा विचार बामसेफ करीत आहे, असे विचार प्रा. गणपत धुमाळे यांनी मांडले.

या अधिवेशतनात समाजातील वंचित शोषित घटकांसाठी संघर्ष वाढून सुद्धा अपेक्षित बदल न होणे, त्यामुळे काही ठिकाणी शासन व शोषित वर्गात संघर्ष वाढतो अशा वेळी अपेक्षित बदल न होणे परीवर्तनवादी आंदोलनासमोरील आव्हान असते. यात बहुजन जो असतो ते आपले धोरण ठरवत असतात. मुलनिवासी बहुजन समाजाच्या सामाजिक ऐक्यानेच सर्वकष अधिकार यासह वर्तमान स्थितीत आवश्यक असणार्‍या विषयांवर बामसेफतर्फे अल्बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय अधिवेशनात वक्त्यांनी विचार व्यक्त केले.

यावेळी कार्यक्रमाच्या उद्घाटक कॉ.नजुबाई गावीत, इंजि.विद्याधर भालेराव,रमेश साळवे, संजय मोहिते,अ‍ॅड.राजेश झाल्टे,महेश पाटील,मुकुंद सपकाळे, मुश्ताक सालार, विकास पाटील, प्रा.एम.डी.धापसे,चेतन नवगिरे, राजेंद्र तायडे, बी.डी.गोळे, आर.बी.चारण,प्रशांत चारण, प्रशांत सपकाळे, फिरोज खान, अ‍ॅड.वैशाली बावीस्कर, सुरेंद्र हिवाळे,शरद केदार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!