Type to search

जळगाव नाशिक

जळगाव पोलिसाचा रेल्वेतून पडून मृत्यू

Share

लासलगाव । राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नाशिक दौर्‍यानिमित्त बंदोबस्तासाठी जाणार्‍या पोलिसाचा आज नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील रेल्वेस्थानकावर गोदान एक्स्प्रेस रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. महेंद्र एस. उमाळे असे मृत पोलिसाचे नाव असून ते जळगाव पोलीस दलात कार्यरत होते.

जळगावहून नाशिककडे प्रयाण करणार्‍या गोदान एक्स्प्रेसमधून पडून गंभीर जखमी झाल्यानंतर उमाळे यांना लासलगाव येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील पवार यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

आज दुपारी गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनल (गोदान एक्स्प्रेस)मधून उमाळे जळगावहून नाशिककडे निघाले होते. लासलगाव रेल्वेस्थानकावर गाडी येताच रेल्वेतून पडून ते गंभीर जखमी झाले. यावेळी रेल्वे राखीव दलाचे पोलीस उपनिरीक्षक महेश महाले व पो.काँ. नितीन टुपके यांनी रुग्णवाहिकेतून त्यांना लासलगाव ग्रामीण रुग्णालयात हलवले. उमाले यांचे डोके, डावा व उजवा पाय निकामी झाला. पाठीलाही गंभीर जखमा झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या प्रकरणी मनमाड रेल्वे पोलीस तपास करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!