Type to search

जळगाव

शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा महावितरणचा निर्णय

Share

जळगाव । वि.प्र.- दुष्काळामुळे जळगाव जिल्ह्यासह भडगाव तालुक्यात थकबाकीदार शेतकर्‍यांचा शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित करीत नसल्याची माहिती महावितरण कंपनीने कळविली आहे. यासंदर्भात ‘देशदूत’मधून ‘दुष्काळात तेरावा महिना : शेतकर्‍यांना महावितरण कंपनीकडून नोटीसा, रोज पाच वीज जोडण्या खंडीत करण्याचे फर्मान’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द झाले होते. याची दखल घेत जळगाव महावितरणने दुष्काळी परिस्थिती असल्याने जिल्ह्यासह भडगाव तालुक्यात टंचाई असेपर्यंत थकबाकीदार शेतकर्‍यांचा शेतीपंपाचा वीज पुरवठा खंडीत करण्यात येणार नाही, असे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

राज्य शासनाने सन 2018 च्या जुन ते सप्टेंबर या खरिप हंगामाकरीता राज्यातील 151 तालुके व 268 महसुली मंडळात गंभीर व मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहिर केला. टंचाई जाहिर केलेल्या गावात शेतकर्‍यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करण्याची सवलत लागू केली आहे, असे महावितरणच्या पत्रकात म्हटले आहे. राज्य शासनाने शेतीपंपाच्या चालू वीजबिलात 33.5 टक्के सुट मंजुर केली आहे. त्यानुसार माहे डिसेंबर 2018 व माहे मार्च 2019 च्या तिमाही वीज बिलात जळगाव जिल्ह्यातील एक लाख 99 हजार 340 शेतकर्‍यांना 102 कोटी रुपयांची सुट दिली आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, भडगाव, भुसावळ, बोदवड, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, जामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा, पारोळा, रावेर, यावल तालुक्यासह एरंडोल तालुक्यातील कासोदा व उत्राण, धरणगाव तालुक्यातील सोनवद या महसुली मंडळातील शेतकर्‍यांना या सवलतीचा लाभ मिळाला आहे, अशी माहितीही पत्रकात देण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!