Type to search

जळगाव

बर्‍हाणपुरात तापी नदीतील दोघांचे प्राण वाचविले

Share

बर्‍हाणपूर ।प्रतिनिधी- देवी विसर्जन करण्यासाठी जैनाबाद पुलाजवळील तापी नदीत भाविक गेले असता त्यात दोघेजण पाण्यात वाहून जात असतांना जवळच असलेल्या पट्टीचे पोहणार्‍या कर्मचार्‍यांनी दोघांना बाहेर काढून वाचविल्याने दोघांचे प्राण वाचविल्याची घटना दि.9 रोजी मंगळवारी दुपारी 2 वाजता घडली.

देवीची विसर्जन करतांना संजय नावाचा व्यक्ती हा नदीच्या पाण्यात बुडत असतांना त्याला पट्टीचे पोहणार्‍यांनी बोटीत बसून त्या युवकाचे प्राण वाचविले हि घटना होत नाही तोवर काही वेळाने दुसर्‍या घटनेत जैनाबाद पुलावरून तापी नदीत एकजण पडल्याने त्यालाही पोहणार्‍यांनी सुरक्षित बाहेर काढण्यात आले.पोलीस प्रशासनातर्फे यावेळी परीसरात तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!