Type to search

जळगाव

केळीभावाबाबतच्या उपोषणाकडे बाजार समिती पदाधिकार्‍यांचा कानाडोळा!

Share

रावेर । केळी बाजार भावाच्या बाबतीत बोर्डवर काही भाव तर प्रत्यक्षात शेतकर्‍यांच्या पदरात पडत आहे काहीच, अशा आपत्कालीन परिस्थिती तालुक्यात उद्भवल्यावर बाजार समितीकडून न्यायिक भूमिका अपेक्षित असतांना, बुधवारी तहसील कार्यालयाबाहेर लाक्षणिक उपोषणाला बसलेल्या शेतकर्‍याकडे बाजार समितीने ढुंकून न पहिल्याने, उपोषणाला बसणार्‍या शेतकर्‍यांत संतापाची लाट तयार झाली आहे.

केळी भावात मोठी विसंगती असल्याने दि.14 रोजी शेतकर्‍यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा आणला होता.त्यानुसार बाजार समितीने अधिकृत व्यापार्‍यांना याअडचणीवर मात करण्यासाठी बैठकीचे आमंत्रण दिले होते.मात्र त्या बैठक ला फक्त 12 व्यापारीच उपस्थित राहिले.तोडगा निघाला नव्हता, त्या अनुषंगाने आज रावेर तहसील समोर तालुक्यातील शेतकरी बांधवांनी लाक्षणिक उपोषण केले. याप्रसंगी निंभोर्‍याचे सुनील कोंडे, माजी जिप सदस्य रमेश पाटील, निंभोरा उपसरपंच सुभाष महाराज, रवींद्र बारी, धनराज खाचणे, मदन खाचणे, डिगंबर नेहेते, अप्पा भंगाळे,किरण कोंडे, डी डी वाणी, दसनुरचे मिलिंद पाटील, श्रीकांत महाजन, योगेंद्र पाटील, अनिल चौधरी, संजय चौधरी रसलपूर, सुरेश शिंदे, उटखेड्याचे बळीराम महाजन, चंद्रकांत सांगळे, अविनाश सांगळे, सुरज पाटील,राहुल शिंदे,

तुकाराम पाटील, ईश्वर निळे, पातोंडीचे चेतन सांगळे, बाळकृष्ण पाटील,ज्ञानेश्वर चौधरी,देवेंद्र पाटील, न्हावीचे संतोष बेंडाळे,एकनाथ महाजन,युवराज महाजन,प्रमोद चौधरी, खानापूरचे गोवर्धन बोंडे,जयंत पायील, खिर्डी,डॉ. मनोहर पाटील,वसंत पाटील,कृष्णा पाटील, विजय परदेशी,जगदीश पाटील,दोध्याचे राहुल महाजन, विजय पाटील,सतीश महाजन,कोचुर,संतोष महाजन,विवरा,खिरवडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका कल्पना उत्तमराव पाटील, उत्तमराव पाटील, जय शिंदे, शे.तस्लिम समाधान कोळी, रघुनाथ शिंदे, शैलेश सांगळे, कोचुरचे ऋषिकेश पंडित, रितेश मस्कावदे, निंभोरासीमम येथील जिजाबराव पाटील,विवरा येथील किशोर पाटील हजर होते. यावेळी तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना केळी उत्पादकांचे निवेदन स्वीकारून उपोषणार्थीना सरबत पाजून उपोषणाची सांगता केली.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!