Type to search

जळगाव

रोज पाच वीज जोडण्या खंडित करण्याचे फर्मान

Share

सुनील पाटील
भडगाव । दुष्काळामुळे राज्य शासनाने शेतकर्‍यांची वीज खंडित करु नये, असे आदेश दिले असतांनाही थकबाकीधारक शेतकर्‍यांच्या शेतातील महावितरण कंपनीकडून दररोज पाच वीज जोडण्या खंडित करण्याचे फर्मान दिले आहे. दरम्यान महावितरणकडून नोटीस देखील बजावण्यात येत असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.

भडगाव तालुक्यात दुष्काळाने शेतकरी, शेतमजुर होरपळा आहे. शेतात पीक नसल्याने शेतकर्‍यांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. दुसरीकडे मजुराच्या हातांना काम नाही. त्यामुळे बाजारपेठवर मोठा परीणाम झाला आहे. अशात वीज कंपनीने वसुलीसाठी तगादा सुरू केला आहे. वीज बील भरा अन्यथा वीज तोडू असा फतवा त्यांनी काढला आहे.

कर्मचार्‍यार्ंना वीजतोडणींचे लक्ष्य
भडगाव तालुक्यात वीज कंपनीच्या अधिकार्‍यांनी वायरमन, लाईनमन यांच्यावर वसुलीसाठी प्रचंड दबाव टाकला आहे. वसुलीचे उद्दीष्ट दिल्याचे आपण नेहमी ऐकतो मात्र अधिकार्‍याांनी कर्मचार्‍यांना चक्क वीज तोडणीचे लक्ष्य दिले आहे. एका कर्मचार्‍याने दररोज कीमान 5 थकीत वीज बील ग्राहकांची जोडणी तोडायची आहे, असे न केल्यास वेतनाच्या 1/3 दंड केला जाईल, असा सुलतानी फतवा काढला आहे. भडगाव तालुक्यात कर्मचार्‍याांना अशा प्रकारच्या नोटीस दिल्या आहेत. त्यामुळे कर्मचारी मोठ्या दबावात आले आहेत.

सक्तीच्या वसुलीने सर्वसामान्य त्रासले
विज वितरण कंपनीच्या वीज जोडण्या तोडण्याच्या फतव्याने दबावात आलेल्या कर्मचार्‍यांनी नाईलाजाने तोडण्याचा धडाका लावला आहे. दुष्काळाच्या चक्रव्युव्याहात अडकलेल्या सर्वसामान्यानी आताच वीजबील भरण्यासाठी पैसा कुठुन आणायचा? वीज बील भरायचे की पेरणीसाठी पैसा उभा करायचा? असे प्रश्न शेतकर्‍यांसमोर उभे राहीले आहेत. मात्र वीज कंपनीला याचे काहीएक देणे घेणे नसुन वसुलीशी बांधीलकी ठेवण्याला त्यांनी प्राधान्य दिले आहे.

दुष्काळात सक्तीची वसुली?
दुष्काळात सक्तीची वसुली करू नये, असे शासनाचे धोरण आहे. हा नियम कृषी पंपाच्या वसुलीबाबत सांगितला जातो. मात्र बिलाअभावी कोणाचे कनेक्शन तोडण्यात येत आहे? नौकरदार पगार झाला की लगेच बील भरतो. मात्र दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत सापडलेला बहुतांश शेतकर्‍यांचे, मजुरांचे बिलाअभावी विज जोडण्या खंडीत होतांना दिसत आहे. त्यामुळे दुष्काळात सक्तीची वसुलीसाठी कर्मचार्‍यांना विज जोडण्या खंडीत करण्याचे लक्ष्य देणे कीतपत योग्य आहे? असा प्रश्न शेतकर्‍यांकडुन उपस्थित होत आहे. तर सुलतानी फतवा काढणार्‍या वीज कंपनीच्या कारभारबाबत शेतकर्‍यांच्या बाजुने भुमिका घेणारे लोकप्रतिनिधी काय भुमिका घेतात? याकडे लक्ष लागुन आहे.

कर्मचार्‍यांना थकीत वीज बीलाची विज जोडण्या खंडीत केल्या नाहीत, म्हणून वरीष्ठ कार्यालयाच्या सुचनेनुसार नोटीस दिल्या आहेत. वीजतोडण्या नाही केल्यास वेतनाच्या 1/3 दंड करण्यात येणार आहे.
– ए.एम पाटील, सहाय्यक अभियंता, वीज कंपनी, भडगाव

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!