Type to search

जळगाव

पालकमंत्री संकटमोचन, पण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था धोक्यातच

Share

जळगाव । राज्य सरकारचे संकटमोचक असलेले तथा जळगाव व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले गिरीश महाजन यांच्या दोन्ही पालक जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचे लक्तरे वेशीवर टांगली गेली आहे. आठवड्याभरात दोन्ही जिल्ह्यात अशा दोन घटना घडल्या आहेत. महाजन हे राज्य सरकारचे संकटमोचक ठरले असले तरी जिल्ह्यातील नागरिकांचे संकटमोचक त्यांना होता आलेले नाही.

गेल्या 4-5 दिवसांपूर्वी नाशिक येथील मुथूट फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर अज्ञात दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात एका कर्मचार्‍याचा जीव गेल्याची घटना घडली होती. त्या घटनेतील दरोडेखोर जेलबंद होत नाही तोच, मंगळवारी रावेर तालुक्यातील निंबोल येथील विजया बँकेच्या शाखेवर भरदिवसा अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकल्याची घटना घडली. त्यात बँक मॅनेजरची हत्या झाली. गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यात दरोडे व चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांना अद्याप गुन्हेगारांवर वचक बसविता आलेला नाही.

यापूर्वी तत्कालीन पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे यांनी गुन्हेगारांवर वचक बसविण्याच्या दृष्टीने कडक पावले उचलली होती. त्यामुळे अवघ्या 9 महिन्यांत जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी करण्यात त्यांना यश आले होते. मात्र पोलीस अधीक्षक म्हणून दरारा निर्माण करण्यात डॉ. उगले कमालीचे कमी पडले आहे. जळगाव शहराचीही हीच अवस्था आहे. कारागृहात बंदी असलेला आरोपी तारखेसाठी बाहेर जातो काय? आणि धिंगाणा घालतो काय हे पोलीसांचा वचक संपल्याचे द्योतक आहे. पोलीस दलात नको तो कमालीचा राजकीय हस्तक्षेप वाढला आहे.

विशिष्ट राजकारण्याची मर्जी जोपसण्याच्या नादात जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेची अक्षरश वाट लागल्याचे चित्र जिल्ह्यात बघायला मिळत आहे. पालकमंत्र्याच्या कार्यालयाबाहेर बॉम्ब ठेवल्याच्या निनावी फोनने जळगावात खळबळ उडाला होती. परंतु हा फोन केला याबाबत पोलीसांचा शोध सुरु आहे. दरम्यान कोणीतरी बनाव केल्याचे बोलले जात आहे. राज्यमंत्री मंडळात अत्यंत प्रभावी कामगिरी करून मुख्यमंत्र्याच्या गळ्यातील टाईत बनलेले गिरीश महाजन यांनी पालकमंत्री या नात्याने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीसांच्या माध्यमातून प्रभावी कामगिरी करून जिल्हावासियांच्या गळ्यातील टाईत बनण्याचे मोठे आव्हान
त्यांच्यासमोर आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!