Type to search

जळगाव

व्यापार्‍यांच्या संपामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचा व्यवहार ठप्प

Share

जळगाव । कृषी उत्पन्न बाजार समितीची संरक्षक भिंत पाडल्याप्रकरणी मार्केट यार्डच्या आडत व्यापारी असोसिएशनने सोमवारी बंद पुकारला असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत बेमुदत संप सुरुच ठेवण्याचा निर्धार व्यापार्‍यांनी केला आहे. व्यापार्‍यांचा बंदचा आज दुसरा दिवस होता. त्यामुळे मंगळवारी कृषी उत्पन्न बाजार समितीचा व्यवहार ठप्प होता.

शनिवारी दि.8 रोजी जळगाव कृउबा समितीची संरक्षक भिंत पाडल्याने मार्केट यार्डच्या आडत व्यापारी असोसिएशन आणि कृउबास सभापती कैलास चौधरी यांची बैठक झाली. या बैठकीत ठोस निर्णय न होता पाच दिवसांचा व्यापार्‍यांनी अल्टिमेटम दिला होता. मात्र, तोडगा न निघाल्याने व्यापार्‍यांनी सोमवार दि. 17 रोजी पासून बंद पुकारला आहे.

मंगळवारी दि.11 रोजी व्यापार्‍यांनी मार्केट यार्ड असोसिएशनचे अध्यक्ष बाळकृष्ण बेहेडेे, उपाध्यक्ष शशिकांत बियाणी, संचालक नितीन बेहेडे, सचिव सुनील तापडिया, कार्याध्यक्ष दीपक महाजन,अशोक राठी, रवींद्र दहाड, रवींद्र सूर्यवंशी, राजेंद्र जोशी, नीलाचंद जैन आदींनी माजीमंत्री सुरेशदादा जैन यांची 7, शिवाजीनगर निवास्थानी भेट घेतली होती. यासंदर्भात जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन आणि सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संवाद साधून संरक्षक भिंतीसह दोन पाण्याच्या टाक्या, गुरांच्या पिण्याचा हाळ बांधून देण्यासह मार्केट यार्डच्या व्यापार्‍यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्याचे सांगितले. यावेळी सुरेशदादा जैन यांनी व्यापार्‍यांच्या पाठीशी राहणार असे आश्वासन दिले होते. तर दुसरीकडे कृउबा सभापती कैलास चौधरी यांनीही त्याच दिवशी सुरेशदादा जैन यांची भेट घेतली होती. व्यापारी व कृउबा सभापती यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र विकासकाकडून भिंत बांधण्यासंदर्भात गुगली मिळाल्याने व्यापार्‍यांनी बंदचे हत्यार उपसले आहे.

…तर संप सुरुच राहणार
8कृउबाच्या संरक्षक भिंतीसह दोन पाण्याच्या टाक्या, शेतकरी व नागरिकांसाठी अँक्वा फिल्टरचे थंडगार पाणी, गुरांच्या पिण्याचा हाळ बांधून देण्यासह 100 झाडांचे वृक्षारोपण करणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र विकासकांनीही काम सुरु केले नाही. परिणामी जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत संप सुरुच राहणार असल्याची प्रतिक्रीया व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बाळकृष्ण बेहेडे यांनी दिली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!